Nashik Political News : बडगुजर यांच्या हकालपट्टीवरुन लक्ष्मण सावजी यांची संजय राऊतांवर टीका

Expulsion of Sudhakar Badgujar : आरोप फेटाळत भाजपचे मोरे यांचीही पोलिस चौकशी होईल, असा दावा केला.
Sanjay Raut, Laxman Savji
Sanjay Raut, Laxman SavjiSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : शिवसेनेचे नेते संजय राऊत रोज उठून भाजपवर आरोप करत आहेत, त्यांना तशी सवयच आहे. कुख्यात आरोपी सलीम कुत्ता यांच्याशी संबंध असलेल्या नाशिकच्या महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्याऐवजी त्यांचे समर्थन राऊत करीत आहेत, याचा खेद वाटत असल्याची टीका भाजपचे प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

ठाकरे गट शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सलीम कुत्ता पार्टीच्या प्रकरणात पक्षाचे नेते बडगुजर यांचे समर्थन करत, पक्ष त्यांच्यामागे खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले होते. या वादग्रस्त पार्टीचे संयोजक भाजपचेच (BJP) होते, असा दावा करीत पार्टीचे आयोजक मोरे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमवेतचे छायाचित्र दाखवले होते.

Sanjay Raut, Laxman Savji
Chandrapur News : नागपुरातील महारॅलीसाठी कार्यकर्ते म्हणाले, 'है तय्यार हम...'

राऊत यांच्या आरोपांना लक्ष्मण सावजी यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, 2016 मधील डान्सपार्टीची एसआयटी व पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे. तरीही राऊत यांनी भाजपवर आरोप केले. ते आरोप पोरकट आणि बेजबाबदारपणाचे आहेत. भाजपचा त्या डान्सपार्टीशी संबंध जोडणे गैर आहे. भाजपबद्दल गैरसमज पसरविण्याचा केविलवाणा प्रयत्न राऊत करीत असल्याची टीका सावजी यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राऊत हे लूट करण्यासाठीच नाशिकमध्ये येत असतात असा गंभीर आरोपही केला. भाजप सुसंस्कृत पक्ष आहे. पक्षाच्या 18 आघाड्या व 7 मोर्चे आहेत. त्यामुळे प्रत्येक स्तरावरून समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पक्षाचे काम व संदेश पोचवण्याचे काम केले जाते. परंतु मूळ विषय बाजूला सारून राऊत हे ती पार्टी भाजपने आयोजित केल्याचा धादांत खोटा आरोप करून भाजपला बदनाम करत आहेत.

बडगुजर हे देशविरोधी कारवाया करणारे आहेत, असा आरोप सावजी यांनी केला. बडगुजर यांना पक्षातून काढून टाकण्याऐवजी त्यांच्या समर्थनार्थ भाजपवर टीका करणे हे जनतेला मान्य होणार नाही, असेही ते म्हणाले. व्यंकटेश मोरे भाजपचा कार्यकर्ता असला तरी, त्याचीही चौकशी पोलिस करीत आहेत. त्यातून जे निष्पन्न होईल ते लवकरच पुढे येईल.

(Edited by Amol Sutar)

Sanjay Raut, Laxman Savji
Shivsena News : इम्तियाज जलील यांचे नेतृत्व चांगले ; ठाकरे गटाच्या नेत्याकडूनच कौतुक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com