Solapur Politics : ‘आंबेडकरांना महाआघाडीत घ्यावं; पण त्यांचं सर्वच ऐकलं...’ : सुशीलकुमारांचे मुद्यावर बोट

Sushilkumar Shinde On Ambedkar : भाजपविरोधातील लढाईत सर्वांना बरोबर घेऊन गेले पाहिजे, या मताचा मी आहे.
Prakash Ambedkar- Sushilkumar Shinde
Prakash Ambedkar- Sushilkumar ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर काय चर्चा सुरू आहे. याची माहिती मला नाही. पण, भाजपविरोधातील लढाईत सर्वांना बरोबर घेऊन गेले पाहिजे, या मताचा मी आहे. प्रकाश आंबेडकर समसमान जागा मागतात. मात्र त्यांचं सगळंच ऐकलं जाईल, असं नाही, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. (Prakash Ambedkar should be taken in Mahalikas Aghadi; But... : Sushilkumar Shinde)

पत्रकारदिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, भाजपच्याविरोधात लढण्यासाठी सर्वांना एकत्र घेतलं पाहिजे. त्यात प्रकाश आंबेडकर यांनाही चर्चेला बोलावलं पाहिजे. मात्र, लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यांना आता कळलं आहे, तरीही ते येऊ इच्छितात, तर त्यांचा स्वीकार केला पाहिजे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Ambedkar- Sushilkumar Shinde
BJP-MNS Alliance : भाजप-मनसेची अनोखी युती; भाजप माजी आमदारांची कन्या होणार राजू पाटलांची सून

बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे, ही काँग्रेसचीपण मागणी आहे. पण, सरकारच्या हातात सगळं आहे. मलासुद्धा विश्वास आहे सरकार सकारात्मक विचार करेल, असे सांगून शिंदे म्हणाले की, मी सध्या निवडणुकीच्या रणनीतीकारांमध्ये नाही. पराभव होतोय म्हणून पळून जाता कामा नये. सोनिया गांधी या पळून जाणाऱ्या नेत्या नाहीत, त्या सध्याच्या काँग्रेसमध्ये सुधारणा करून वेगळा मार्ग पुढे आणतील, याविषयी माझ्या मनात काही एक शंका नाही.

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याबाबत ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी जे वाचलंय ते सांगितलंय. कुणी काय सांगावं, हे मी बघायला गेलो नव्हतो. राम मंदिरावरून मी भाजपला काय संदेश देणार, तेच संदेश देण्याचं काम करतात. येत्या 22 तारखेला जो कार्यक्रम आहे, ते करतील तो त्यांचा कार्यक्रम आहे. राम मंदिराबाबत प्रत्येकाच्या भावना आहेत, त्याला विरोध करायचा प्रश्नच येत नाही.

Prakash Ambedkar- Sushilkumar Shinde
Pandharpur Obc Melava : मंत्री बंत्री मी नंतर अगोदर ओबीसी कार्यकर्ता; छगन भुजबळांचा पंढरीतून इशारा

राम आम्हा सर्वांना प्रिय आहे. हिंदू-मुसलमानांनाही तो प्रिय आहे. राम मंदिराच्या कार्यक्रमाला पक्षीय स्वरूप देण्याचा प्रयत्न होत आहे, त्याला आमचा विरोध असणार आहे. रामावर फक्त भाजपच हक्क दाखवू शकत नाही. राम ही त्यांना दाखवू देणार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

आजची पत्रकारिता आणि कालची पत्रकारिता यामध्ये फरक आहे. काही जण पोटापाण्यासाठी येतात, तर काही जण पत्रकारिता धर्म म्हणून या क्षेत्रात येतात. समाजाला जे अभिप्रेत आहे, असं ते काम करीत असतात. मागील पत्रकारितेने आम्हाला देश मिळवून दिला. त्यावेळच्या पत्रकारांनी आम्हाला दिशा दाखवून दिली. पण, पत्रकारितेमध्ये दबाव येत असेल तर बदलायचे काम जनतेने केले पाहिजे. एखाद्या ठराविक मर्यादेच्या बाहेर गेल्यानंतर जनताच ते काम हातात घेते, असा दावाही शिंदे यांनी केला.

Edited By : Vijay Dudhale

R...

Prakash Ambedkar- Sushilkumar Shinde
Raj Thackeray Sabha : महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न अन्‌ आपले नेते मिंधे, लाचार झालेत; राज ठाकरेंचा घाणाघात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com