Shalarth ID scam : जळगाव जिल्ह्यातील ६५० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचे आदेश, बोगस मान्यता प्रकरणात कारवाई

Jalgaon Teacher Salary Stoppage : बोगस वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यातील ६५० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Teacher Approval Scam
Teacher Approval ScamSarakrnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon Teacher Scam : बोगस वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी घोटाळ्यातून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा या घोटाळ्याचे केंद्र असून सर्वाधिक संशयित तेथील आहेत. आता या घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून जिल्ह्यातील माध्यमिक विभागातील सुमारे ६५० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.

शिक्षण विभागाकडून संबंधित शिक्षक व संस्थाचालकांना सोमवार, (दि. २६) ऑक्टोबरपासून आदेशांचे वितरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १३२ कर्मचाऱ्यांच्या मान्यता रद्द करण्याचे आदेश जळगावच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयला प्राप्त झाले आहेत.

नाशिक विभागातील नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात एकुण ८९३ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता रद्द करण्याची कार्यवाही सुरू आहे. यात एकट्या जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक विभागातील सुमारे ६५० शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्यात आल्या आहेत.

तपासादरम्यान अनेक प्रकरणांत भरतीपूर्व जाहिरात, आरक्षण रोस्टर, मुलाखतींचे तपशील आणि निवड समितीचे ठराव उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे.

Teacher Approval Scam
Nashik Kumbh Mela : राष्ट्रपतींच्या हस्ते कुशावर्त व त्र्यंबकेश्वर मंदिरात किती मिनिटे पूजा? वेळापत्रक ठरलं.. प्रशासनाचं अचूक नियोजन!

वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ मान्यता रद्द करण्यासह संबधित कर्मचाऱ्यांचे शासकीय वेतन अनुदान थांबविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित संस्थाचालक, तत्कालीन मुख्याध्यापक आणि लाभार्थी कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Teacher Approval Scam
Someshwar Election: 'सोमेश्वर'वर सुनेत्रा पवारांचे निर्विवाद वर्चस्व; सर्व 21 जागा जिंकल्या : पुरुषोत्तम जगतापांचे 13 वर्षांचे साम्राज्य संपुष्टात

अनियमिततेच्या काळात संबंधित पदांवर कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही खातेनिहाय चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित आहे. नियमबाह्य पद्धतीने वेतन घेतल्याचे निष्पन्न झाल्यास वसुलीची कारवाई केली जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com