Someshwar Election: 'सोमेश्वर'वर सुनेत्रा पवारांचे निर्विवाद वर्चस्व; सर्व 21 जागा जिंकल्या, पुरुषोत्तम जगतापांचे 13 वर्षांचे वर्चस्व संपले! युगेंद्र पवारांनाही धक्का

Someshwar Sugar Factory Election Result: बारामतीच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलने सर्व २१ जागा जिंकल्या. पुरुषोत्तम जगताप यांचे १३ वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले, तर युगेंद्र पवार यांच्या पॅनेललाही मतदारांचा अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही.
Someshwar Sugar Factory Election Result
Someshwar Sugar Factory Election ResultSarkarnama
Published on: 
Updated on: 

बारामती: बारामती तालुक्यातील बहुचर्चित श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने सर्व २१ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंड केले खरे मात्र त्यांचाही सुनेत्रा पवार यांच्या झंझावातात दारुण पराभव झाला. बारामती तालुक्याच्या राजकारणावर अजितदादा यांच्यानंतर देखील आपली पकड कायम असल्याचे या निकालाने सुनेत्रा पवार यांनी सिध्द करत विरोधकांची हवा काढून घेतली.

अगदी शेवटच्या क्षणी विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंडाचा झेंडा फडकवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध पॅनल उभे केले होते. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांच्या काळात सुनेत्रा पवार, पार्थ पवार व जय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करत प्रचाराला दिशा दिली.

सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावे पिंजून काढत नाराजांची नाराजी दूर करत जे उमेदवार दिलेले आहेत, त्यांच्या पाठीशी पक्षाची सर्व ताकद उभी करत एक हाती विजय खेचून आणला. चुरशीची निवडणूक होईल असे चित्र निर्माण झाले होते, प्रत्यक्षात मात्र सभासदांच्या पाठिंब्यामुळे ती कमालीची एकतर्फी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व 21 उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला.

Someshwar Sugar Factory Election Result
8th Pay Commission News: पगार वाढणार, पण कधी? केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फिटमेंट फॅक्टर, एरियरचं गणित

पुरुषोत्तम जगताप यांच्या मागे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून भाजपने देखील ताकद उभी केली होती. युगेंद्र पवार यांनीही पॅनेल उभे करुन आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्यक्षात या दोघांनाही भोपळाही फोडता आला नाही. सभासदांनी त्यांना नाकारत अजितदादांच्या विचारावर वाटचाल करणा-या संचालकांच्या पारडयात मत टाकले.

दुसरीकडे सुनेत्रा पवार यांना शिवसेनेचे आमदार विजय शिवतरे यांनी पाठिंबा देत मदतीचा हात पुढे केला होता. सलग तेरा वर्षे अध्यक्ष पद भूषविलेले पुरुषोत्तम जगताप काही चमत्कार घडवून दाखवतील, अशी चर्चा कार्यक्षेत्रात होती. प्रत्यक्षात शेवटच्या चार दिवसात सुनेत्रा पवार, जय पवार व पार्थ पवार यांनी कार्यक्षेत्र पिंजून काढत सभासदांना वेगळा विश्वास देऊ केला.

Someshwar Sugar Factory Election Result
PM Poshan Yojana: शाळांतील स्वयंपाकी अन् मदतनिसांसाठी गुड न्यूज! 74 कोटी मंजूर; राज्य सरकारचा नवा GR

अजित पवार यांच्या निधनानंतर पुरुषोत्तम जगताप यांनी केलेले बंड सभासदांना रुचले नाही, तेरा वर्ष अध्यक्षपद देऊनही त्यांनी पवार कुटुंबियांच्या विरोधात घेतलेली भूमिका सभासदांना पटलीच नाही, त्यामुळे त्यांनी अजित पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेत या पॅनलला भरघोस मताधिक्याने विजयी केले.

ज्या उमेदवारांच्या नावांना पुरुषोत्तम जगताप यांनी विरोध केला होता ते सर्व उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी झाले. गेल्या एक तपाहून अधिक काळ असलेली जगताप यांची या कारखान्यावरील सत्ता या पराभवाने संपुष्टात आली.

श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलचे विजयी उमेदवार त्यांना मिळालेली मते

निंबूत खंडाळा गट क्रमांक एक-

अभिजित सतीश काकडे- 14049

प्रमोद भगवानराव काकडे- 14981

डॉ. वसंतराव रामराव दगडे- 13999

मुरुम वाल्हा गट क्रमांक दोन

विक्रम आनंदराव भोसले- 13584

ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड- 13941

राजवर्धन शिवाजीराव शिंदे- 14015

होळ मोरगाव गट क्रमांक तीन

रवींद्र जयवंतराव भापकर- 12075

मकरंद चंद्रकांत सस्ते- 14316

मनीषा आनंदकुमार होळकर- 14226

को-हाळे सुपा गट क्रमांक चार

राजेंद्र हरिभाऊ बोरकर- 13896

अक्षय धनंजय खलाटे- 14500

सुनील नारायण भगत- 13746

मांडकी जवळार्जुन गट क्रमांक पाच

सतीश संपत जगताप-14647

सुधाकर ज्ञानोबा टेकवडे- 13819

उत्तम महादेव धुमाळ- 13870

महिला राखीव प्रतिनिधी अ वर्ग

प्रणिता मनोज खोमणे- 14356

छबुबाई अंकुश नाझिरकर- 13583

भटक्या जाती व विमुक्त जमाती

अशोक चंद्रकांत धायगुडे- 14540

इतर मागासवर्गीय

शैलेश पंढरीनाथ रासकर- 14577

अनुसूचित जाती जमाती

द्वारकोजी गुलाब साळवे- 14064

ब वर्ग प्रतिनिधी

संग्राम तानाजी सोरटे -93

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com