Uddhav Thackeray : CM फडणवीसांना त्यांच्याच डावाने उत्तर देणार : आता उद्धव ठाकरेही फोन फिरवणार!

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला असून यापूर्वी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. आता ठाकरे फडणवीसांना फोन करणार आहेत.
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Government
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Government Sarkarnama
Published on
Updated on

Vice President election : येत्या ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी आज (दि. २९) मुंबईत मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्दव ठाकरे यांची भेट घेतल्याने या निवडणूकीला वेगळं वळल आलं आहे. यावेळी पत्रकारपरिषदेत उद्धव ठाकरेंनी रेड्डी यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर केला.

आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन करणार आहे. इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा देण्याची विनंती मी फडणवीस यांना करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. संख्याबळ कमी असलं तरी चमत्काराला चौकट नसते तो कसाही होऊ शकतो. देशावर प्रेम करणाऱ्यांनी रेड्डी साहेबांना निवडून द्यावे. एनडीएचे खासदारही आमच्या बाजुने मतदान करुन शकतात असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल व एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी मला फोन केला होता हे खरं आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. त्यांनी माझा पक्ष चोरला, माझा पक्ष फोडला, माझी माणसं चोरली तरीही त्यांच्या समोर उभे राहून जे माझे निवडून आलेले लोक आहेत तेही आता त्यांना पाहीजे. त्यांच्या या विनंतीला काय अर्थ आहे? असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. याउलट मी स्वत:फडणवीस यांना फोन करुन रेड्डींना पाठिंबा द्या म्हणून विनंती करणार आहे, लोकशाहीच्या रक्षणासाठी ते गरजेचे आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Government
Rajabhau Waje : 'गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनास पाठिंबा' खासदार वाजेंनी जाहीर करुन टाकलं..

यावेळी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देणाऱ्या जगदीप धनखड यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, धनखड हे उपराष्ट्रपती होते आणि प्रकृतीचं कारण सांगून अचानक गायब झाले. त्यांच्याविषयी कुणाला काहीही माहिती नाही. हे जे काही चालू आहे ते गूढ वाढवणारं आहे. उपराष्ट्रपतीपदलाही एक सन्मान आहे. त्यामुळे या पदावर एक जबाबदार व्यक्ती बसली पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. मतदान गुप्त पद्धतीने होणार असल्याने एनडीएच्या ज्या खासदारांचे देशावर प्रेम आहे. त्यांनी रेड्डींना मतदान केलं पाहिजे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Government
Manoj Jarange Patil Agitation: अजित दादांच्या आमदार सरोज अहिरे म्हणाल्या, माझा जरांगेंना मनापासून पाठिंबा, खासदार भगरे थेट आझाद मैदानात!

राष्ट्रपती पदाची ज्यावेळेला निवडणूक होती.त्यावेळेला तर मी न मागता त्यांना मतदान केलं होतं. कोणी मला विनंती केली नव्हती. निवडून आल्यानंतर साधे धन्यवाद सुद्धा कुणी केलं नाही. गरज असेल तेव्हा वापरा नसेल तेव्हा फेकून द्या अशा पद्धतीला आपण नाकारलं पाहीजे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com