Jalgaon Politics : शिंदेंच्या एका आमदाराविरोधात भाजपची आख्खी फौज मैदानात, पुरेपुर हिशोब करणार

Kishor Patil vs BJP leaders : आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघात भाजपला आव्हान दिलं आहे. कोणत्याही परिस्थिती माझ्या मतदारसंघात युती होणार नाही अशी घोषणा त्यांनी केली आहे.
Girish Mahajan & Eknath Shinde
Girish Mahajan & Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : शिवसेनेचे (शिंदे गट) पाचोरा-भडगाव विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांनी आपल्या मतदारसंघात स्वबळाची घोषणा केली आहे. कुठल्याही स्थितीत भाजपसोबत युती करणार नाही असे पाचोऱ्यात घेतलेल्या निर्धार मेळाव्यातही त्यांनी स्पष्ट केले. तसेच निर्धार मेळाव्यातून भाजप नेत्यांवर टीका करत विविध आरोप केले. किशोर पाटलांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांचा पुरेपूर समाचार घेणार आहोत अशी माहिती आता माजी आमदार तथा भाजप नेते दिलीप वाघ यांनी दिली आहे.

किशोर पाटलांनी निर्धार मेळाव्यात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपने आपल्या मतदारसंघात बंडखोरी केल्याचा राग त्यांनी व्यक्त केला. अमोल शिंदे, वैशाली सूर्यवंशी, प्रताप पाटील यांच्यावर तोफ डागली. त्यामुळे पाचोरा मतदारसंघात भाजप व शिवसेनेतील तणाव वाढला आहे. त्यानंतर आता भाजप नेते किशोर पाटलांच्या विरोधात एकवटल्याचे चित्र आहे.

भाजपच्या शिवतीर्थ मध्यवर्ती कार्यालयात सोमवारी भाजप नेत्यांनी पत्रकारपरिषद घेतली व किशोर पाटलांचे आरोप फेटाळले. माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह वैशाली सूर्यवंशी, अमोल शिंदे, संजय वाघ, प्रताप पाटील, बन्सीलाल पाटील, शिवदास पाटील, अनिल पाटील, प्रदीप पाटील, सूरज वाघ, दीपक माने, संदीप जैन आदी भाजप नेते व पदाधिकारी या पत्रकारपरिषदेला उपस्थित होते.

Girish Mahajan & Eknath Shinde
Nashik Crime : मंत्र्यांशी ओळख असल्याचे दाखवत फसवणूक करणारी 'ती' महिला कोण? गिरीश महाजनांनी घेतली दखल

दिलीप वाघ यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या परिवर्तन मेळाव्यासंदर्भात माहिती दिली. बुधवारी सकाळी दहा वाजता सारोळा रोडवरील श्री समर्थ लॉन्समध्ये परिवर्तन मेळावा होणार आहे. मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, राधेश्याम चौधरी यांच्या उपस्थितीत हा मेळावा होईल. किशोर पाटील यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचा समाचार या मेळाव्यात घेऊ असं दिलीप वाघ म्हणाले.

Girish Mahajan & Eknath Shinde
Chhagan Bhujbal : बिहारमध्ये प्रचारात बॅनरवर भुजबळांचा फोटो लावण्यास मनाई, उमेदवार म्हणाला मग उमेदवारीच नको..

आमदार किशोर पाटील यांनी माझ्यासह अमोल शिंदे, वैशाली सूर्यवंशी, प्रताप पाटील यांच्यावर केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. कोणताही विषय नसताना काहीतरी जोडून मनोरंजन करण्याचा प्रयत्न किशोर पाटील यांनी केला आहे. दरम्यान मेळाव्यास पाचोरा शहर व ग्रामीणचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देण्याचे आवाहन दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी, अमोल शिंदे व संजय वाघ यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com