Jalgaon constituency 2024 : मतदारांच्या 'त्या' प्रश्नाने भाजप नेते का होतात निरुत्तर!

Sharad Pawar जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या स्मिता वाघ विरुद्ध महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे करण पवार यांच्यात थेट सामना आहे.
Smita Wagh, Karan Pawar
Smita Wagh, Karan Pawarsarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan politics News : जळगाव मतदारसंघाची निवडणूक भाजपला सोपी होती. मात्र, विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्षांतर केले. आता विद्यमान खासदारच विरोधात प्रचार करीतआहेत. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या स्मिता वाघ विरुद्ध महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे करण पवार यांच्यात थेट सामना आहे. यामध्ये भाजपच्या स्मिता वाघ यांचा किल्ला भाजप नेते ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन लढवत आहेत. स्वतः मंत्री महाजन यांनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे.

भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी व भाजपचे पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार हेदेखील शिवसेनेत दाखल झाले. शिवसेना ठाकरे गटाने त्यांना उमेदवारी दिली आहे. करण पवार यांचा प्रचार खासदार उन्मेष महाजन करीत आहेत. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी दोन्हींसाठीही निवडणूक चुरशीची झाली आहे.

Smita Wagh, Karan Pawar
Jalgaon Lok Sabha: "तुम्हाला संकटमोचक म्हणत असले, तरी देव म्हटलेलं नाही, म्हणून...", उन्मेष पाटील महाजनांवर बरसले

भाजपचे गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर अतिशय जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाने गेले दहा वर्षांत केंद्रात उत्तम कामगिरी पार पाडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेल्या कामकाजाची यादी सादर करतात केंद्र सरकार बरोबरच येथील खासदारानेदेखील चांगले काम केले आहे. त्यामुळे मतदारांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन ते करतात.

मंत्री महाजन यांचा हा प्रचार अतिशय आक्रमक असल्याने महाविकास आघाडीकडूनही त्याला त्याच शब्दात उत्तर दिले जातात. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या या प्रचारात मतदारांकडून मात्र वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केंद्रातील सरकार चांगले होते. त्यांची कामगिरी उत्तम आहे. खासदारांचेही काम चांगले झाले आहे. मग भाजपने उमेदवार तरी का बदलला? खासदाराला उमेदवारी का दिली नाही? खासदाराने दुसऱ्या पक्षाचे दार का ठोठावले? असे प्रश्न मतदारांकडून विचारले जात आहेत.

Smita Wagh, Karan Pawar
Congress Vs BJP : लोकसभा आली अन् काँग्रेसचे 'हे' दिग्गज नेते भाजपात दाखल

या प्रश्नांनी मात्र भाजपच्या नेत्यांची चांगलीच फजिती होत आहे. मंत्री गिरीश महाजन हे जळगाव भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय घेतात. उमेश पाटील यांना विधानसभेचे उमेदवारी आपणच दिल्याचा दावा ते करतात. लोकसभेचे उमेदवारी गेल्या निवडणुकीत स्मिता वाघ यांना जाहीर झाली होती. मात्र, ऐनवेळी स्मिता वाघ यांच्या ऐवजी उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Smita Wagh, Karan Pawar
Jalgaon Lok Sabha Constituency : भाजप माझे तिकीट बदलणार नाही, स्मिता वाघ यांचा विश्वास !

त्याचे कारण काय? ते अद्याप कोणाला कळलेले नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ऐनवेळी उमेदवार बदलण्याची जी खेळी केली, त्यावरदेखील मतदारसंघात चांगली चर्चा आहे. या सर्व राजकीय प्रचारात प्रारंभी गावची निवडणूक भाजपला एकतर्फी वाटत होती. ती आता खुद्द खासदार उमेश पाटील हेच शिवसेनेला जाऊन मिळाल्याने काहीशी अवघड झाली आहे, त्यामुळे भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी या निवडणुकीत तुटून पडले आहेत.

Edited By : Umesh Bambare

R

Smita Wagh, Karan Pawar
Jalgaon Lok Sabha: "तुम्हाला संकटमोचक म्हणत असले, तरी देव म्हटलेलं नाही, म्हणून...", उन्मेष पाटील महाजनांवर बरसले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com