Unmesh Patil on Girish Mahajan: गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) पाप-पुण्याबाबत बोलू नये, लोकांनी तुम्हाला संकटमोचक म्हटलं असलं, तरी देव म्हटलेलं नाही, अशा शब्दांत भाजपची साथ सोडत शिवसेना (Shivsena) ठाकरे गटात प्रवेश केलेल्या उन्मेष पाटील यांनी गिरीश महाजनांवर टीका केली. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पाटील विरुद्ध महाजन असा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघातून (Jalgaon Lok Sabha Constituency) भाजपकडून उमेदवारी मिळावी, यासाठी उन्मेष पाटील (Unmesh Patil) इच्छुक होते. मात्र भाजपने पाटलांचा पत्ता कट करत ऐनवेळी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी नाकारल्यामुळे उन्मेष पाटील नाराज झाले आणि त्यांनी थेट ठाकरे गटाची वाट धरली. पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत सहभागी झाल्यापासून जळगावमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अशातच आता जळगावमध्ये भाजपला (BJP) 5 लाखांचं लीड मिळेल असा विश्वास गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी व्यक्त केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना उन्मेष पाटील म्हणाले, भाजपकडून अबकी बार 5 लाख पार म्हटलं जात आहे. पण आम्ही अबकी बार करण पवार म्हणतोय. भाजप फक्त डोकी मोजतं आहे. पण आम्ही लोकांच्या मनातील विचार मोजतोय. आमच्याबरोबर शेतकरी आणि तरुणवर्ग आहे, असं म्हणत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.
'ज्यांचं पुण्य संपतं ते लोक भाजपमधून बाहेर जातात,' अशी टीका महाजन यांनी केली होती. यावर बोलताना पाटील म्हणाले, "तुम्हाला लोकांनी संकटमोचक म्हटलं असलं, तरी तुम्हाला देव म्हटलेले नाही. त्यामुळे गिरीश महाजन यांनी पाप पुण्याबाबत बोलू नये तो हिशेब जनता करेल."
तसेच महाजनांना लोकांकडे मते मागण्याचा अधिकार नाही, असंही पाटील म्हणाले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्याला अनुदान नाही. लिंबू उत्पादक शेतकऱ्याला, कापसाला अनुदान नाही. त्यामुळे कॅबिनेट मंत्री असूनही तुम्ही काही करत नसाल तर तुम्हाला मत मागण्याचा अधिकार नाही, असंही पाटील म्हणाले.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.