Jalgaon Police Crime : 50 लाखांचा विमा हडपण्याचा डाव फसला ; जळगावच्या 'त्या' चार पोलिसांवर चालणार खटला , गृहखात्याची मंजुरी

₹50 Lakh Insurance Fraud Case Exposed in Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटला चालविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पोलिस दलात याप्रकरणाची चर्चा आहे.
Jalgaon Crime, Jalgaon News,
Four Police Personnel Face Trial After Home Department ApprovalSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon Police Create Fake Accident Story : आजारपणामुळे मृत्यू झालेल्या व्यतीचा मृत्यू हा अपघाती मृत्यू असल्याचे भासवून तब्बल ५० लाख रुपयांची विमा रक्कम हडपण्याचा कट उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कटात नातेवाईक, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चार पोलिसांचा समावेश आढळून आला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

दरम्यान या गंभीर प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटला चालविण्यास गृहखात्याने मंजुरी दिली आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी रवींद्र बत्तीसे, सचिन निकम, सुनील निकम आणि महेंद्र पाटील यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून खटला चालविला जाणार जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका व्यक्तीचा २३ फेब्रुवारी २०२४ रोजी आजारपणामुळे मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर मृताच्या पत्नीने, भावाने आणि काही एजंटांनी मिळून विम्याची ५० लाख रुपयांची मोठी रक्कम लाटण्याच्या उद्देशाने संबंधित व्यक्तीचा मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव रचला. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात संबधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला.

Jalgaon Crime, Jalgaon News,
Jalgaon DCC Bank : "लढत झाली असती तरी मीच जिंकलो असतो!" गिरीश महाजनांचा कॉन्फिडन्स हाय; सांगितले मतांचे गणित

याप्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खोटा वैद्यकीय अहवाल देत अपघाती मृत्यू दाखवला. तसेच मेहुणबारे, चाळीसगाव, पाचोरा पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांनी या खोट्या अपघाताचा पंचनामा आणि इतर कागदपत्रे तयार करून मदत केली होती.

दरम्यान विमा कंपनीचे अधिकारी मयताच्या घरी पडताळणीसाठी गेले असता भिंतीवर लावलेल्या मयताच्या फोटोवर मृत्यूची खरी तारीख (२३ फेब्रुवारी २०२४) दिसली. तेथून बनाव उघड झाला व या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन तपासात संशयितांचा ५० लाखांचा विमा हडपण्याचा हा मोठा डाव अखेर फसला.

Jalgaon Crime, Jalgaon News,
JDCC Bank Election : मंत्री रक्षा खडसे की आमदार चंद्रकांत पाटील? माघारीसाठी उरले दोन दिवस : मुक्ताईनगरच्या जागेवरुन भाजप-शिवसेनेत वाद

विमा रक्कम हडपण्यासाठी बनावट नोंद कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्या प्रकरणात जळगावच्या चारही पोलीस कर्मचाऱ्यांवर न्यायालयात अभियोग दाखल करण्यास गृहखात्याने मंजुरी दिली आहे. अटकेनंतर चारही पोलिसांची कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.