

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या विजयाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
माझ्या विरोधातील उमेदवाराचा अर्ज त्रुटींमुळे बाद झाला. मात्र निवडणुकीत प्रत्यक्ष लढत झाली असती तरी मीच बहुमताने विजयी झालो असतो असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. आपल्या विजयाचे गणित सांगताना, जामनेर सोसायटी मतदारसंघातील ९४ पैकी ८५ सोसायटींची मते आमच्या समर्थकांची आहेत असा दावा गिरीश महाजन यांनी केला.
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजप मंत्री गिरीश महाजन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे. कारण महाजन यांच्या विरोधात जामनेर तालुका विकास सोसायटीमधून अर्ज दाखल करणाऱ्या रघुनाथ सखाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणास्तव बाद केला.
दरम्यान, त्या विरोधात रघुनाथ पाटील यांनी नाशिक येथील विभागीय सह निबंधकांकडे आपला अर्ज वैधकरण्याच्या संदर्भात दाद मागितली होती. मात्र नाशिक येथील सह निबंधकांनी देखील त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. आता रघुनाथ पाटील हे न्यायालयात आता दाद मागू शकणार आहेत.न्यायालयात काय निर्णय होतो हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी सध्याच्या निर्णयामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडण्याबाबतचा मार्ग सुकर झाला असल्याचे मानले जात आहे.
या सर्व घडामोडीवर माध्यमांशी बोलताना विरोधी उमेदवाराचा अर्ज बाद झाला म्हणून नाही तर, प्रत्यक्ष लढत झाली असती तरी मीच जिंकलो असतो असं मंत्री महाजन यांनी म्हटलं आहे. एक अर्ज माझ्याविरोधात होता, मात्र तांत्रिक चुकांमुळे तो फेटाळला गेला आहे. मात्र, तो फेटाळला गेला नसता तरीही प्रत्यक्ष लढतीतही मीच विजय झालो असतो. कारण जामनेर सोसायटी मतदारसंघातील ९४ पैकी ८५ सोसायटींची मते भाजपचीच आहे.
दरम्यान, मुक्ताईनगर, बडगाव, पाचोरा या जागांवरील तिढा हळहळू सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीमध्येच आम्ही लढणार आहोत. त्यामुळे कोणताही तिढा आमच्यात राहणार नाही. निवडणुकीत भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत राहणार आहे, मात्र अद्याप कुणाला किती जागा याची अंतिम आकडेवारी ठरलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.