JDCC Bank Election : जळगाव जिल्हा बॅंकेत चेअरमन कुणाचा, भाजप-शिवसेनेच्या वादावर तोडगा निघाला?

Jalgaon District Bank Chairman Post: BJP or Shiv Sena? : जळगाव जिल्हा बॅंकेच्या चेअरमन पदावरुन शिवसेना-भाजपमध्ये खल सुरु आहे. चेअरमनपद भाजपकडे, तर व्हाईस चेअरमनपद शिवसेनेकडे जाणार असल्याची चर्चा आहे.
JDCC Bank Election | जळगाव जिल्हा बॅंक
JDCC Bank Election | जळगाव जिल्हा बॅंक Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी सुरु असलेल्या राजकीय घडामोडी दिवाळीमुळे काहीशा थांबल्या आहेत. मात्र, दिवाळीनंतर या घडामोडींना पुन्हा वेग येणार आहे.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीतील तीन घटक पक्ष एकत्र निवडणूक लढवणार की स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार बॅंकेचे चेअरमनपद कोणाकडे राहणार यावरुन सध्या खल सुरु आहे. शिवसेना-भाजपमध्ये त्यावरुन मतभेद आहेत. असे असताना आता, बँकेचे चेअरमनपद भाजपकडे, तर व्हाईस चेअरमनपद शिवसेनेकडे जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील युतीबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान अर्ज छाननीच्या प्रक्रियेदरम्यान शिवसेनेचे पाचोऱ्यातील आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आल्याने भाजप आणि शिवसेनेतील राजकीय तणाव वाढला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये समन्वय कसा साधला जातो हे पाहावे लागणार आहे.

एकीकडे मंत्री गिरीश महाजन यांनी मित्रपक्षांना सोबत घेण्याची तयारी असल्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुती कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार समोरासमोर आले आहेत. त्यावरही मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली सामोपचाराने मार्ग काढला जाईल, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

JDCC Bank Election | जळगाव जिल्हा बॅंक
JDCC Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणूक : एका उमेदवाराला किती खर्च करता येणार? कमाल मर्यादा ठरली

दरम्यान भाजप-शिवसेनेच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून युतीबाबत सकारात्मक विधाने येऊ लागल्याने आता जिल्हा बँकेच्या सत्ता वाटपाबाबतही चर्चा सुरू झाली आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमनपद भाजपकडे, तर व्हाईस चेअरमनपद शिवसेनेकडे राहणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

JDCC Bank Election | जळगाव जिल्हा बॅंक
JDCC Bank Election : जागावाटपाआधीच जळगाव जिल्हा बँकेत मोठा ट्विस्ट ! महायुतीच्या तीन जागा बिनविरोध

मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात यासंदर्भात एकमत झाल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान चेअरमनपद भाजपकडे गेल्यास या पदावर मंत्री गिरीश महाजन यांच्या विश्वासातील व्यक्तीची वर्णी लागू शकते. तर व्हाईस चेअरमनपद शिवसेनेच्या वाट्याला आल्यास मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जवळच्या व्यक्तीला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चेअरमन व व्हाईस चेअरमनपद पदाची अशाप्रकारे वाटणी करत जिल्हा बँकेच्या सत्तेचे संतुलन राखण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केला जाऊ शकतो. दरम्यान यासंदर्भात राष्ट्रवादीची काय भूमिका राहते तेही महत्वाचे ठरणार आहे. सध्या राष्ट्रवादीने सात जागांची मागणी केली आहे. राष्ट्रवादीने चेअरमनपदाची मागणी केल्यास तिढा वाढू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.