Jalgaon Politics : मंगेश चव्हाणांच्या कबुलीने उडाली ठिणगी, आमदार पुत्राची जीभ घसरली, जळगावात शिवसेना-भाजपतील वाद वाढला

Mangesh Chavan, Sumit Patil Dispute : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्ज छाननीच्या प्रक्रियेत सुमीत पाटलांचा अर्ज बाद झाला होता. त्यानंतर तो पुन्हा वैध झाला करण्यात आला होता.
Mangesh Chavan, Sumit Patil Dispute
Mangesh Chavan, Sumit Patil DisputeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon DCC Bank Election: जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुक प्रक्रियेत सुरुवातीला पाचोऱ्याचे शिवसेना आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमीत पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. त्यावरुन पाटील यांनी अदृश्य शक्तीच्या दबावामुळे अर्ज बाद झाल्याचा आरोप केला होता.

त्यावरून भाजप व शिवसेनेत चांगलाच वाद झाला. मात्र, आता आपणच अधिकाऱ्याला फोन केल्यानंतर अर्ज अवैध ठरविण्यात आल्याची कबुली आमदार मंगेश चव्हाण यांनी जाहीर सभेत दिली.

जिल्हा बॅंक निवडणुकीसंदर्भात गुरुवारी( दि. १९) झालेल्या महायुतीच्या बैठकीत चव्हाणांनी आपल्या भाषणातून ही कबुली दिल्यानंतर बैठकीस उपस्थित सुमीत पाटील यांनी चव्हाण यांचे भाषण सुरु असतानाच तातडीने संतापात बैठकीतून काढता पाय घेतला. बैठकस्थळातून बाहेर येत सुमीत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया देताना सुमीत पाटलांनी चव्हाणांबद्दल अपशब्द वापरल्याने हा वाद आता आणखी वाढला आहे.

आमदार मंगेश चव्हाण काय म्हणाले?

आमदार चव्हाण म्हणाले, अधिकाऱ्यांना मीच सांगितलं हा फॉर्म अवैध करा म्हणून, आणि ज्यावेळी फॉर्म वैध करायचा होता तेव्हाही मीच सांगितले, फॉर्म वैध करा. गुलाबभाऊ, गिरीशभाऊंनी माझ्याच फोनवरून अधिकाऱ्याशी बोलत सुमितचा अर्ज वैध ठरविला. त्याठिकाणी आमच्या उमेदवाराने माघारही घेतली, असे वक्तव्य चव्हाणांनी केल्याने बैठकीत चांगलीच खळबळ उडाली.

दरम्यान शिवसेनेच्या दोन जणांनी मंगेश चव्हाण यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे युतीत कुणी गद्दारी केली तर व्याजासह त्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. जे आडवे येतील त्यांच्या छातावर पाय ठेवून पुढे जाण्याची माझी ताकद आहे. मी लेचापेचा कार्यकर्ता नाही. ह्यांची काय लायकी आहे हे 30 तारखेला दिसेल असं मंगेश चव्हाण म्हणाले.  

गुलाबराव पाटील यांच्यासमोर भडगाव आणि पाचोऱ्याची माघार घेण्याचा शब्द दिला होता. एकदा शब्द दिला की तो आम्ही कधी फिरवत नाही. तुम्ही चाळीसगावची माघार घेतली नसली, तरी आम्ही माघार घेतली, असे चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

Mangesh Chavan, Sumit Patil Dispute
Jalgaon DCC Bank Election : रक्षा खडसे, मंगेश चव्हाणांना बिनविरोध करण्यात महाजनांना अपयश; दोन जागांवर रंगणार लढत!

सुमीत पाटील यांचा मंगेश चव्हाण यांच्यावर जहरी टीका

“मंगेश चव्हाण यांनी माझा फॉर्म उडवला आणि त्यांनीच पुन्हा तो वैध केला, याची त्यांनी जाहीर कबुली दिली आहे. मंगेश चव्हाण नामर्द माणूस आहे." निवडणूक अधिकाऱ्याला मोठी रक्कम देऊन माझा फॉर्म बाद करण्यात आल्याचा आरोप सुमीत पाटील यांनी केला. भाजप आणि आमचे चांगले संबंध आहेत मात्र केवळ एका माणसामुळे वाद निर्माण होत आहे, अशा व्यक्तीला दूर ठेवावे अशी विनंती मी गिरीश महाजन यांच्याकडे करणार असल्याचं सुमीत पाटील यांनी सांगितलं.

अर्ज बाद करण्याचे आणि बिनविरोध करण्याचे श्रेय त्यांनी घेऊ नये. सतीश शिंदे यांचे सूचक आणि अनुमोदक माझ्यासोबत होते, त्यामुळे ते निवडणूक लढवू शकत नव्हते, असे स्पष्टीकरण सुमित पाटील यांनी दिले

Mangesh Chavan, Sumit Patil Dispute
Jalgaon DCC Bank Election : अदृश्य शक्तीची जादूही ठरली फेल, शिवसेना आमदार किशोर पाटलांनी करुन दाखवलं, मुलाची बिनविरोध निवड

दरम्यान सुमीत पाटील यांनी अपशब्द वापरल्यानंतर त्यावर माध्यमांशी बोलताना मंगेश चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सुमितने काय वक्तव्य केले, हे माहीत नाही. इतरांकडून ते ऐकले. त्याच्याबद्दल मी काय बोलणार? याविषयी त्याचे वडील किशोरआप्पांशी चर्चा करेल.

सुमीत पाटील यांची मंगेश चव्हाण यांच्यावर जहरी टीका

“मंगेश चव्हाण यांनी माझा फॉर्म उडवला आणि त्यांनीच पुन्हा तो वैध केला, याची त्यांनी जाहीर कबुली दिली आहे. मंगेश चव्हाण हा नामर्द माणूस आहे." निवडणूक अधिकाऱ्याला मोठी रक्कम देऊन माझा फॉर्म बाद करण्यात आल्याचा आरोप सुमीत पाटील यांनी केला. भाजप आणि आमचे चांगले संबंध आहेत मात्र केवळ एका माणसामुळे वाद निर्माण होत आहे, अशा व्यक्तीला दूर ठेवावे अशी विनंती मी गिरीश महाजन यांच्याकडे करणार असल्याचं सुमीत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान सुमीत पाटील यांनी अपशब्द वापरल्यानंतर त्यावर माध्यमांशी बोलताना मंगेश चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सुमितने काय वक्तव्य केले, हे माहीत नाही. इतरांकडून ते ऐकले. त्याच्याबद्दल मी काय बोलणार? याविषयी त्याचे वडील किशोरआप्पांशी चर्चा करेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.