JDCC Bank Election : जळगाव जिल्हा बॅंकेत महायुतीविरोधात काँग्रेसने दंड थोपटले ; स्वतंत्र पॅनल उतरवलं, सात उमेदवार रिंगणात

Jalgaon DCC Bank Election: Congress Forms Shetkari Ekta Panel Against Mahayuti : महायुतीच्या विरोधात स्वतंत्र पॅनल तयार करत कॉंग्रेसने सात उमेदवारांना रिंगणात उतवलं आहे. मात्र, मित्र पक्षांनी स्वतंत्र चूल मांडल्याने कॉंग्रेसला एकट्याला झुंज द्यावी लागू शकते.
JDCC Bank Election | जळगाव जिल्हा बॅंक
JDCC Bank Election | जळगाव जिल्हा बॅंक Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना शेवटपर्यंत आशेवर ठेवलं. मात्र, शेवटपर्यंत एकही जागा दिली नाही. याउलट महायुतीच्या तब्बल १२ जागा बिनविरोध झाल्या. आता उर्वरित ९ जागांसाठी मतदान पार पडणार आहे.

दरम्यान आता महायुतीविरोधात काँग्रेसने दंड थोपाटले आहेत. महायुतीविरोधात कॉंग्रेसने शेतकरी एकता पॅनलची स्थापना करुन सात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या पॅनला टॅक्टर हे चिन्ह मिळाले आहे. बुधवारी कॉंग्रेस भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, अध्यक्ष धनंजय निकम, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील देवरे आणि प्रशांत चौधरी यांनी यासंदर्भात माहिती दिली. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष जमील शेख, बाबा देशमुख उपस्थित होते.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीने आमदार, मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच उमेदवारी दिली आहे. शेतकऱ्यांची बँक असलेल्या या संस्थेत शेतकरीपुत्रांना संधी मिळावी, तसेच निवडणूक बिनविरोध न होता लोकशाही पद्धतीने व्हावी, या उद्देशाने काँग्रेस व शेतकरी संघटनेने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी पॅनेलतर्फे सात उमेदवार रिंगणात आहेत. आज कॉंग्रेस व शेतकरी संघटनेची बैठक होत आहे.

JDCC Bank Election | जळगाव जिल्हा बॅंक
Satish Patil: जळगाव बँकेच्या निवडणुकीतून माजी मंत्री सतीश पाटलांची ऐनवेळी माघार: गुलाबराव देवकर, संजय पवारांवर दगाबाजीचा आरोप

असे आहेत शेतकरी एकता पॅनलचे उमेदवार

यामध्ये महिला राखीव मतदारसंघातून ज्योती नाना पाटील व सुलोचना भगवान पाटील, इतर संस्था मतदारसंघातून प्रशांत लिलाधर चौधरी, ओबीसी गटातून सुनील देवरे, भटक्या-विमुक्त जाती-जमाती मतदारसंघातून विकास ज्ञानेश्वर वाघ, तर रावेर तालुक्यातून प्राथमिक कृषी पतपुरवठा सोसायटी मतदार संघातून योगीराज पाटील, यावल तालुक्यातून प्रशाांत लिलाधर चौधरी हे उमेदवार आहेत.

मित्र पक्षांची वेगळी चूल

काँग्रेसने 'शेतकरी एकता पॅनल' स्थापन करून महायुतीविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी, महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या भूमिकेमुळे या पॅनलमधील एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पत्रकार परिषदेत काँग्रेसने मित्र पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्यासोबत असल्याचे सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात या दोन्ही मित्र पक्षांनी आपली 'वेगळी चूल' मांडल्याचे स्पष्ट केले आहे.

JDCC Bank Election | जळगाव जिल्हा बॅंक
Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी! 12 उमेदवार बिनविरोध; शिवसेनेने मारली मोठी मुसंडी, भाजपलाही टाकलं मागे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी नैसर्गिक न्यायानुसार आमचा पाठींबा काँग्रेसच्या बाजूने असला, तरी सर्व तालुकाध्यक्षांशी चर्चा करूनच पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचं म्हटलं आहे.

तर दुसरीकडे, उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी मी स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं सांगितलंं. शेतकरी एकता पॅनलचे चिन्ह आणि माझे चिन्ह वेगवेगळे आहे. जर मी या पॅनलमध्ये असतो, तर आम्हा सर्वांचे चिन्ह एकच असते, असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या पॅनलशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले असून एकप्रकारे आपली चूल वेगळी असल्याचे संकेत दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.