Kishor Patil : 'माझ्यासमोर आता एकच टार्गेट' ; मंगेश चव्हाणांसह तीन अधिकाऱ्यांना किशोर पाटलांचा इशारा!

Kishor Patil Issues Warning to Mangesh Chavan and Three Officials : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतली आहे.
Kishor Patil On Mangesh Chavan  : Jalgaon DCC Bank Election
Kishor Patil On Mangesh Chavan
Published on: 
Updated on: 

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन जळगावात रण तापलं आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी शिवसेना आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा अर्ज आपणच अवैध ठरविला होता अशी जाहीरपणे कबुली दिल्याने वाद निर्माण झाला आहे. किशोर पाटील यांनी आता चव्हाण यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

किशोर पाटील यांनी सोमवार (दि.२३) जळगावात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी मुद्दा छेडल्याने किशोर पाटलांनी पुन्हा याविषयावर भाष्य केलं. ते म्हणाले, तो अर्ज मागे घेतला की नाही, यामध्ये मला आता जायचे नाही. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील महामेळाव्यात मला जे काही सांगायचे होते, ते मी सांगितले आहे. आता फक्त माझ्यासमोर एकच टार्गेट असल्याचं सांगत त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना इशारा दिला.

किशोर पाटील म्हणाले, आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार पदाला न शोभणारे काम केले आहे. आमदारकीची शपथ घेताना आचारसंहितेसंदर्भात जी शपथ दिली जाते त्याचे चव्हाणांनी उल्लघंन केले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव टाकून त्यांनी माझ्या मुलाचा फॉर्म बाद करायला लावला.

Kishor Patil On Mangesh Chavan  : Jalgaon DCC Bank Election
Kishor Patil : 'मला समजावू नका, तेवढी अक्कल माझ्यात आहे' ; गुलाबराव पाटलांची मध्यस्थी किशोर पाटलांना खटकली

जिल्हा बँकेचा विषय आता बाजूला राहिला आहे. माझे आता एकच टार्गेट आहे. ते म्हणजे डीडीआर गायकवाड, जॉइंट रजिस्ट्रार संभाजी निकम आणि निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी. या तिघांचा हिशेब आता अधिवेशनात पाहायला मिळणार असल्याचा इशारा किशोर पाटील यांनी दिला.

जॉइंट रजिस्ट्रार हे डीडीआर यांना फॉर्म रिजेक्ट करुन आपल्याकडे पाठवायला सांगतात. त्यानंतर फॉर्म सिलेक्ट करण्यासाठी जी तोडीपाणी होते, त्यासाठी असले प्रकार केले जातात. संभाजी निकम यांनी केवळ माझाच अर्ज बाद केला नाही, तर या लोकांची ही खेळीच आहे, असा गंभीर आरोप किशोर पाटील यांनी केला.

Kishor Patil On Mangesh Chavan  : Jalgaon DCC Bank Election
Jalgaon DCC Bank Election : रक्षा खडसे, मंगेश चव्हाणांना बिनविरोध करण्यात महाजनांना अपयश; दोन जागांवर रंगणार लढत!

आचारसंहितेचे उल्लंघन करून निवडणूक निर्णय अधिकारी आणि डीडीआर यांच्यावर फोन करून दबाव टाकला जातो. जर एखाद्या ऑडिटरने ती संस्था 'ब' वर्गात असल्याचे सांगितले असेल, तर तिचा वर्ग रद्द करण्याचा अधिकार सहकार क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीला किंवा सहकारमंत्र्यांनाही नाही. त्यामुळे ती संस्था त्यादिवशीही 'ब' वर्गात होती आणि आजही 'ब' वर्गातच आहे. त्यामुळे खाडाखोड केली का, असे लहान मुलांसारखे सांगणे अत्यंत चुकीचे आहे.हा विषय केवळ जिल्हा बँकेच्या निवडणुकीपुरता मर्यादित नाही. त्यांनी आपल्या आमदारपदाचा गैरवापर केला आहे. त्या गैरवापराचाही मी हिशेब चुकता करणार असल्याचा इशारा किशो पाटलांनी दिला.

संयम गुलाबरावांनीच ठेवावा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संयमाची भूमिका घेण्याचे वक्तव्य केले होते. त्यावर आमदार किशोर पाटील यांनी पुन्हा एकदा त्यांना सुनावलं. तो संयम त्यांनीच ठेवावा. माझ्याकडे संयम नाही. मी न्यायाची बाजू मांडणारा माणूस आहे. न्याय मिळवून देण्यासाठी संयम पाळत बसत नाही.

गुलाबभाऊंनी तो संयम पाळावा. आमच्याकडेही संयम आहे. परंतु न्यायाची बाजू मांडण्याची वेळ आली, तर जिथे आणि ज्यावेळी गरज पडेल, त्यावेळी लाथ मारून पाणी काढण्याची हिंमत आमच्यात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.