Pune Timber Market : पुण्यात पहाटेच्या सुमारास अग्नितांडव! 25 हून अधिक दुकाने जळून खाक

Pune Timber Market Fire : टिंबर मार्केटमधील विजयवल्लभ शाळेजवळ असलेल्या दुकानांना पहाटेच्या सुमारास आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि परिसरातील इतर दुकानांमध्येही ती पसरली. आगीची तीव्रता मोठी असल्याने अग्निशमन दलाला ती नियंत्रणात आणण्यासाठी चार तासांहून अधिक काळ प्रयत्न करावे लागले.
Pune Timber Market Fire | 25 Shops Burnt | Pune News
Pune Timber Market Fire | 25 Shops Burnt | Pune NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 18 Nov : पुण्यातील टिंबर मार्केट परिसरात बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत 50 ते 60 दुकानांना आग लागली असून, 25 हून अधिक दुकाने जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दुकानांलगत असलेल्या वस्तीतील काही घरांनाही आगीची झळ बसली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे, गेल्या आठ वर्षांत टिंबर मार्केटमध्ये आग लागण्याची ही तिसरी घटना आहे.

टिंबर मार्केटमधील विजयवल्लभ शाळेजवळ असलेल्या दुकानांना पहाटेच्या सुमारास आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि परिसरातील इतर दुकानांमध्येही ती पसरली. आगीची तीव्रता मोठी असल्याने अग्निशमन दलाला ती नियंत्रणात आणण्यासाठी चार तासांहून अधिक काळ प्रयत्न करावे लागले. या आगीत दुकानांसोबतच जवळच्या वस्तीतील काही घरांचेही नुकसान झाले.

Pune Timber Market Fire | 25 Shops Burnt | Pune News
Latur DCC Bank : जिल्हा बँकेत सहकाराचा नवा अध्याय, प्रत्येक आमदाराच्या घरात संचालकपद, एकच अपवाद...!

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 30 बंब घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी जवळच्या नाल्यातील पाण्याचाही वापर करण्यात आला. मोटारीच्या साहाय्याने नाल्यातील पाणी बाहेर काढून अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. यासाठी अनेक खासगी पाण्याचे टँकरही बोलावण्यात आले होते.

Pune Timber Market Fire | 25 Shops Burnt | Pune News
Crime News : दारूच्या नशेत महिलेचा पोलीस ठाण्यातही राडा; महिला अधिकाऱ्याला मारहाण, पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

दरम्यान, या आगीची व्याप्ती मोठी असल्याचे समोर आले असून, टिंबर मार्केटमधील सुमारे 50 ते 60 दुकानांना आगीचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 30 बंब आणि सुमारे 150 जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही आग धुमसत असल्याने खबरदारी घेतली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच पुण्याच्या महापौर मंजुषा नागपूर आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी टिंबर मार्केटला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात येत असून, परिसरातील परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.दोन गटांतील युवकांमध्ये झालेल्या वादातून जाळपोळ करण्यात आली होती का आणि त्यातून ही आग लागली का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.