Jalgaon District Bank News : अजितदादा गट जिल्हा बँक अध्यक्षांचा मोठा निर्णय; व्याजदर बंद करणार...

Jalgaon district Bank Interest News : "बँकेकडे आज मोठे कर्जदार नाहीत ते बँकेकडे यावे यासाठी.."
Jalgaon News
Jalgaon NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : अनिष्ट तफावतीत असलेल्या जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांना व्याजाचा मोठा भुर्दंड बसत होता. त्यामुळे दिवसेंदिवस ही रक्कम वाढत जात होती. त्यामुळे या संस्थांना दिलासा देण्यासाठी जिल्हा बँकेने अनिष्ट तफावतीवर लावण्यात येणारे व्याज या वर्षापासून बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात जळगाव जिल्हा बँकेने प्रथमच महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे सांगण्यात आले. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार बँकेचे जिल्हाध्यक्ष आहेत. (Latest Marathi News)

Jalgaon News
Ahmednagar News : कुणाची कशी जिरवायची, ते काम माझ्यावर सोडा..

जळगाव जिल्ह्यात एकूण 876 विविध कार्यकारी संस्था आहेत. यापैकी 553 संस्था अनिष्ट तफावतीत आहेत. त्याची एकूण रक्कम 605 कोटी 10 लाख रुपये आहे. यात 50 लाखांवरील अनिष्ट तफावतीच्या 291 संस्था आहेत. त्यांची एकूण रक्कम 649 कोटी 13 लाख रुपये आहे. या अनिष्ट तफावतीवर जिल्हा बँकेतर्फे 11 टक्के व्याजदराचा भुर्दंड बसत होता.

विविध कार्यकारी सोसायटीवरील अनिष्ट तफावतीची रक्कम दरवर्षी वाढतच होती. त्यामुळे विविध कार्यकारी सोसायटीची थकबाकीची रक्कमही वाढत असल्याने त्यांना अडचणी निर्माण होत होत्या. जिल्हा बँकेने या सोसायट्यांवर असलेल्या अनिष्ट तफावतीच्या रकमेवर असलेले व्याजदर बंद करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या सभेत ठेवला होता. अध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत संचालक मंडळाने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 अखेरचे व्याज बंद करण्यास मंजुरी दिली आहे.

Jalgaon News
NCP Vs BJP Politics : ‘एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्याला लागलेले ग्रहण आहे’

संस्थांना मोठा दिलासा -

ग्रामीण विकासाच्या दृष्टीने विविध कार्यकारी सोसायट्या महत्त्वाच्या आहेत. अनिष्ट तफावतीवर व्याज आकारणी होत असल्याने त्यांच्या थकाबाकीत वाढ होत होती. भविष्यात हीच आकारणी सुरू राहिल्यास अनेक सोसायट्या बंद झाल्या असत्या. पर्यायाने बँकही डबघाईस आली असती. व्याज बंद झाल्याने सोसायट्यांना दिलासा मिळणार आहे. भविष्यात बँकेलाही फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले.

याबाबत जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले की,"ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. तो अधिक मजबूत व्हावा, यादृष्टीने संचालक मंडळाने अनिष्ठ तफावतीवरील व्याज आकारणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय बँकेकडे आज मोठे कर्जदार नाहीत ते बँकेकडे यावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com