Jalgaon : जळगाव जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होणार ? ; गुलाबराव पाटील, खडसेंकडून नाव..

Jalgaon District Bank : उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटांचे अमोल चिमणराव पाटील यांच्या नावांची चर्चा आहे.
Eknath Khadse & Gulabrao Patil
Eknath Khadse & Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon District Bank : जळगाव जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची आज (शनिवार) निवड होत आहे. महाविकास आघाडी व शिवसेना शिंदे गट यांची संयुक्त सत्ता असून महाविकास आघाडीकडे अध्यक्षपद तर शिंदें गटाकडे उपाध्यक्ष पद असणार आहे. मात्र यात राजकीय डावपेच झाल्यास उलटफेर होण्याची शक्यता आहे.

अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ऍड रवींद्र पाटील , संजय पवार ,डॉ.सतीश पाटील व प्रदीप देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटांचे अमोल चिमणराव पाटील यांच्या नावांची चर्चा आहे.

Eknath Khadse & Gulabrao Patil
Hasan Mushrif : मुश्रीफांच्या कागल येथील घरावर ED चा पुन्हा छापा : दीड महिन्यातील दुसरी कारवाई

अध्यक्षपद निवडीसाठी महाविकास आघाडीची माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी आज बैठक होत आहे. त्यात नाव निश्चित होईल.उपाध्यक्ष पदाचे नाव पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या बैठकीत निश्चित करण्यात येईल.

मात्र दोन्ही पदासाठी नावावर एकमत न झाल्यास निवडणूक होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आहे. जिल्हा बँकेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता ही निवड होणार आहे.

Eknath Khadse & Gulabrao Patil
BJP : लोकसभेच्या गमावलेल्या जागा जिंकण्यासाठी BJP चा मेगा प्लॅन ; तीन नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे माजी आमदार गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने ही निवड होत आहे.

जिल्हा बँकेत महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट हे सत्तेत आहेत. सध्या जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे १०, ठाकरे गटाचे दोन, काँग्रेसचे तीन, शिंदे गटाचे पाच, भाजपचा एक, असे पक्षीय बलाबल आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com