Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत ट्विस्ट! बिनविरोधची शक्यता मावळली, मविआने घेतला मोठा निर्णय

Jalgaon DCC Bank Election, MVA Panel : जिल्हा बॅंकेच्या आखाड्यात मविआचे स्वंतत्र पॅनल उतरणार असल्याने बिनविरोधची शक्यता मावळी आहे. मविआच्या भूमिकेनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Jalgaon DCC Bank, जळगाव जिल्हा बॅंक
Jalgaon DCC Bank, जळगाव जिल्हा बॅंक Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon Politics : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे. बँकेची अधिकृत निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीच्या काही जणांकडून प्रयत्न केले जात असताना महाविकास आघाडीने या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तीन प्रमुख पक्षांच्या महाविकास आघाडीने एकत्रित येऊन निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे ठरविले असून तसे स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीने निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकल्यामुळे आता निवडणूक बिनविरोधची शक्यता मावळली आहे.

महाविकास आघाडीतील संभाव्य नावांवर प्रत्येक तालुक्यातील पक्षप्रमुखांसोबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर मविआच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक होईल, ज्यामध्ये निवडणुकीची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिली आहे. महाविकास आघाडीने स्वतंत्र पॅनल उभारण्याचे ठरविल्याने ही निवडणूक आता चुरशीची होणार आहे.

Jalgaon DCC Bank, जळगाव जिल्हा बॅंक
Girish Mahajan : गिरीश महाजन म्हणजेच मुख्यमंत्री, तीन मंत्र्यांसमोर राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचे थेट विधान

दरम्यान, सहकारी बँकेवर सलग दहा वर्ष संचालक राहिलेल्या संचालकांना बँकेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याचे सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने विद्यमान ९ संचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयाची कल्पना मातब्बर संचालकांना आल्याने त्यांनी आधीच कुटुंबीयांतील सदस्यांच्या नावाचे ठराव करून घेतले आहेत. आता या दिग्गजांचे कुटुंबातील सदस्य रिंगणात उतरतील. त्यामुळे बॅंकेच्या राजकारणात आता मात्तबर संचालकांच्या वारसदारांची एण्ट्री होणार हे निश्चित झाले आहे.

'९' संचालकांची अडचण

सलग दहा वर्षाच्या नियमामुळे विद्यमान अध्यक्ष संजय पवार, संचालक एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार अनिल पाटील, ॲड. रवींद्र पाटील यांच्यासह नऊ संचालकांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.

संचालकांच्या सलग दहा वर्षांच्या कालावधीबाबत अजून राज्य शासनाकडून सूचना आलेल्या नाहीत. ते संचालक अर्ज भरू शकतात. बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ते संचालक अर्ज करू शकतात. मात्र कोणी हरकत घेतल्यास अर्ज अवैध ठरू शकतो. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक महेश गायकवाड यांनी दिली आहे.

Jalgaon DCC Bank, जळगाव जिल्हा बॅंक
Jalgaon Politics : सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाने बदलणार गणित ; जळगाव जिल्हा बँकेतील 'त्या' दिग्गजांच्या दीर्घ कारकिर्दीला सुरुंग

जिल्हा बँकेसाठी अंतिम मतदार संख्या

या निवडणुकीसाठी एकूण ३,०७४ मतदारांची अंतिम यादी घोषित झाली आहे. संस्था सभासद म्हणून २५७१ मतदार असून वैयक्तिक सभासद म्हणून ४७४ मतदार आहेत. आता महायुतीची उमेदवारांची चाचपणी आणि महाविकास आघाडीचे स्वतंत्र पॅनल यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे पक्के आहे.

प्राथमिक विविध कार्यकारी संस्था, दूध डेअरी संस्था, मालविक्री प्रक्रिया सहकारी संस्था, अर्बन सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था, पगारदार सहकारी संस्था आदी संस्थांचे सभासद मतदार या निवडणुकीसाठी असतात. मागील पंचवार्षिक निवडणूक २१ नोव्हेंबर २०२१ ला झाली होती. यंदा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com