Girish Mahajan : गिरीश महाजन म्हणजेच मुख्यमंत्री, तीन मंत्र्यांसमोर राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचे थेट विधान

Pratibha Shinde Calls Girish Mahajan the Chief Minister : सध्या देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने संकटमोचक महाजनांनाच मुख्यमंत्री संबोधल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon Tribal Protest : राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदाला सर्वोच्च महत्त्व आहे. त्यामुळे या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक नेत्यांकडून राजकीय समीकरणे जुळवली जातात. काहींच्या वाट्याला हे पद सहज आले, तर काहींना त्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. आजही अनेक नेते मुख्यमंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असून, भाजपमधील त्यांचे निकटवर्तीय म्हणून मंत्री गिरीश महाजन यांचे नाव चर्चेत असते.

राज्यात आंदोलन असो, एखादे राजकीय संकट असो किंवा सरकारसमोर निर्माण झालेली पेचप्रसंगाची स्थिती, अशा वेळी मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळेच त्यांची ओळख ‘संकटमोचक’ अशी झाली आहे. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या प्रतिभा शिंदे यांनी महाजन यांचा उल्लेख थेट मुख्यमंत्रिपदाशी जोडला आहे. ‘गिरीशभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री,’ असे विधान त्यांनी भरसभेत केल्याने राजकीय वर्तुळात या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.

जळगावमध्ये गेल्या चार दिवसांपासून आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी मंत्री पुढे आले असून, त्यांनी मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासने दिली. याच चर्चेदरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या आणि आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत केलेल्या विधानाने लक्ष वेधले. ‘गिरीशभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री… गिरीशभाऊ बोलले म्हणजे मुख्यमंत्री बोलतात,’ असे त्या सर्व मंत्र्यांसमोर म्हणाल्या.

Girish Mahajan
Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघातात PSI चा मृत्यू, रुग्णालयात नेत असताना वाटेतच प्राण सोडले

यावेळी, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी मंत्री अशोक उईके तसेच इतर नेते मंडळी उपस्थित होते. त्यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. प्रतिभा शिंदे यांनी केलेल्या विधानाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रतिभा शिंदे यांच्या वक्तव्याचा वेगळा राजकीय अर्थ लावला जात आहे. त्यांच्या या विधानामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर महाजन हे मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य दावेदार ठरू शकतात का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. या विधानातून महाजन यांच्या आश्वासनांवर असलेला विश्वास अधोरेखित होत असला, तरी त्याला मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य दावेदारीशी जोडून पाहिले जात आहे.

Girish Mahajan
Nashik Politics : ठाकरेसेनेत स्वीकृतवरून अंतर्गत धुसफूस ; नाशिकमध्ये पक्ष कार्यालयाबाहेर लागलेल्या ‘त्या’ होर्डिंगची चर्चा...

आश्वासनानंतर आंदोलन मागे

वनपट्टेधारकांच्या प्रलंबित मागण्या जिल्हा प्रशाासन स्तरावर सोडविण्याचे तर राज्य स्तरावरील मागण्या मंत्री मंडळाच्या बैठकीत सोडविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. लोकसंघर्ष मोर्चाच्या संस्थापक अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.

प्रतिभा शिंदे व पदाधिकाऱ्यांसोबत शनिवारी मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ.अशोक उइके, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीत हा निर्णय झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com