Jalgaon News : 35 मिनिटांत 34 लाखांचा ऐवज साफ; जळगावात माजी आमदाराच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, कसे शिरले घरात?

Jalgaon theft News former MLA Sahebrao Patil house : जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी चक्क माजी आमदाराच्या घरातील तिजोरीवर हात साफ केला आहे. माजी आमदार नाशिकला गेले असताना चोरट्यांनी डाव साधला.
Jalgaon robbery
Jalgaon robberySarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जळगावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चक्क माजी आमदाराच्या घरात चोरी केली आहे. या चोरीत चोरट्यांनी तब्बल 34 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. जिल्ह्यात या घटनेनं खळबळ उडाली असून चोरट्यांना खाकीचा धाकच राहिला नसल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामन्य लोकांकडून येत आहे.

अमळनेर येथील माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पारोळा तालुक्यातील राजवड या मूळ गावी असलेल्या बंगल्यात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील 24 लाख रुपयांचे 700 ग्रॅम सोने व 10 लाख रुपयांची रोकड असा एकुण जवळपास 34 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत नीलेश उर्फ बाळा अशोक पाटील यांनी फिर्याद दिली. त्यानुसार याप्रकरणी शनिवारी रात्री पारोळा पोलिस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.

माजी आमदार पाटील हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलाकडे नाशिकला गेलेले असताना चोरट्यांनी इकडे डाव साधला. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ते आत शिरले. चोरट्यांनी यावेळी तिथे असलेल्या सीसीटीव्हींची तोडफोड केली. पोलिसांच्या हाती काही लागू नये याची खबरदारी घेत डीव्हीआर देखील सोबत घेऊन गेले. चोरट्यांनी एकूण 34 लाख 8 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

Jalgaon robbery
Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या चेहऱ्यावर आनंद मावेना, १० वर्ष राजकारणापासून दूर राहिलेला तो नेता भाजपात दाखल

दरम्यान यात एक सीसीटीव्ही समोर आला आहे. त्यात चार चोरटे कैद झाले आहेत. ते चारही जण धरणगाव रस्त्याकडून सागाच्या झाडांमधून माजी आमदारांच्या बंगल्याकडे आले आणि कम्पाउंडच्या भिंतीवरून घरात शिरल्याचे दिसत आहे. त्यातून मिळालेल्या फुटेजनुसार रात्री 2:39 मिनिटांनी ते घरात शिरले. 3:14 मिनिटांनी चोरी करून बाहेर पडले. म्हणजे 35 मिनिट ते घरात होते. त्यांच्या एकूण हालचालीवरून, वर्णन, अंगावरील कपड्यांवरून ते पुढे एखाद्या सीसीटीव्हीत कैद झालेत का याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Jalgaon robbery
Chhagan Bhujbal : चुकीचं बोलणाऱ्या नेत्यांकडे लक्ष द्या, छगन भुजबळांचा सल्ला कुणाला?

घटनेची माहिती मिळाल्याबरोबर पोलीस उपाधीक्षक यांच्यासह अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी फॉरेन्सिव व श्वान पथकास पाचारण केले. त्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला. आता त्या चारही चोरांचा माग काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून थेट माजी आमदाराच्या घरात चोरी झाल्याने परिसरातील सर्वसामन्यही धास्तावले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com