Jalgaon Crime : आंतरजातीय विवाहावरून दोन राजकीय गटांमध्ये वाद ; पोलीस स्टेशनवरच दगडफेक, काचा फुटल्या... जळगावात नेमकं काय घडलं?

Jalgaon Love Marriage : जळगावात प्रेमविवाहानंतर दोन्ही कुटुंबिय व राजकीय संमर्थकांमध्ये मोठा वाद झाला. आक्रमक जमावाकडून पोलीस स्टेशनवरच दगडफेक झाली. पोलिस स्टेशनच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
Jalgaon MIDC Police station
Jalgaon MIDC Police stationSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील एका तरण-तरुणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोठा वाद झाला. प्रेमविवाह केल्यानंतर सरंक्षण मिळावे, यासाठी जोडपे रात्री दहाला पोलिस ठाण्यात पोहचले होते.

विवाह करुन दोघे पोलिस स्टेशन आल्याची माहिती मिळताच दोन्ही बाजूचे लोक एमआयडीसी पोलीस ठाण्यात धडकले. यावेळी उभय पक्षांना 'लिड' करणाऱ्या दोन राजकीय गटांत राडा झाला. एकीकडून स्थानिक नगरसेवक तर दुसरीकडून जिल्हापरिषद सदस्य असल्याने दोन्ही गट समोरासमोर येऊन पोलिस ठाण्यातच वाद सुरु झाला. दोन्ही कुटुंबांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याने वाद हाताबाहेर गेला. हाणामारी व गोंधळात दगडफेक झाली व पोलिस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करून गर्दी पांगवली. या प्रकरणी दोन्ही गटावर गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील असोदा येथील तरुणाचे एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील तरुणीसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध असल्याने दोघांनी पळून जाऊन लग्न केले. दोघेही कायद्याने सज्ञान असल्याने रितसर विवाह करून नवदाम्पत्य जळगावात दाखल झाले.

Jalgaon MIDC Police station
Jalgaon Crime : जळगाव हादरलं ! झेडपीच्या शाळेत चौथीतील विद्यार्थिनीवर अत्याचार ; आईच्या तक्रारीवरून नराधम शिक्षकाला अटक

दोघांच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच शोधाशोध सुरू असतानाच नवदाम्पत्य रात्री दहाच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्यात धडकले. कुटुंबीयांपासून जीविताला धोका असल्याचे त्यांनी सांगितल्यावर दोघांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी पाचारण करण्याअगोदरच दोन्ही बाजूंचा जमाव पोलिस ठाणे आवारात एकवटला होता.

मुलीकडील बाजूने कैलास सोनवणे यांचा गट तर मुलाकडील बाजूने रवींद्र देशमुख यांच्यासह समर्थकांचा गट पोलिस ठाण्यात समोरासमोर धडकल्याने आरडाओरड, शिवीगाळ, दमदाटीसह ऐकमेकांच्या अंगावर धाऊन जात तुंबळ हाणामारी झाली.

Jalgaon MIDC Police station
Anna Hazare Protest : अण्णा हजारेंच आंदोलन थांबवण्यासाठी फडणवीस सरकारचे युद्ध पातळीवर प्रयत्न; चर्चेच्या दुसरी फेरीत ठरणार पुढची दिशा

अचानक घडलेल्या प्रकाराने ठाणे अंमलदारसह हजर कर्मचारीही गोंधळले. दोन्ही गटाने पोलिस ठाण्यात केलेल्या मारहणीत खिडकीच्या काचा फुटल्याने पोलिसांचा संयम सुटला. घडल्या प्रकाराची दखल घेत निरीक्षक बबन अव्हाड, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, संजय पाटील यांनी गोंधळ घालणाऱ्यावर लाठीचार्ज करून पोलिस ठाण्याच्या आवारातच फोडून काढले. घटेनेची माहिती वायरलेसवर प्रसारित होताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह राखीव पेालिसांची अतिरीक्त तुकडी पोलिस ठाण्यात दाखल झाली.

प्रेमविवाहाच्या या प्रकरणात एक गट विद्यमान नगरसेवकाशी संबंधित गट आणि एका माजी जिल्हा परिषद सदस्याशी संबंधित गट असून रात्री उशिरा पोलिसांनी याप्रकरणी जखमी पोलिसाची फिर्याद नोंदवून घेत कैलास सोनवणे गटातील स्वप्नील पवार, पवन पवार, रुपेश ऐशी यांच्यासह इतर, समोरील शांताराम पाटील यांच्याकडून पूर्वाश्रमीचा पोलिस असलेला राजकीय पदाधिकारी रवी देशमुख याच्यासह धवल पाटील, सुनील पाटील आणि इतर अशा संशयितांची ओळख पटवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून या प्रकरणात इतर संशयितांचा शोध घेतला जात असल्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी माहिती देताना सांगितले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसांचे एक पथक संशयितांचा शोध घेत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com