Jalgaon MLC Election : नंदकिशोर महाजनांच्या उमेदवारीचे श्रेय कुणाला? रक्षा खडसे व गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा

Girish Mahajan, Raksha Khadse : ऐरवी उमेदवारी मिळवून दिल्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा असते. मात्र जळगावात नंदकिशोर महाजनांच्या उमेदवारीचे श्रेय का कुणी घ्यायला तयार नाही हा मोठा सवाल आहे.
Raksha Khadse, Girish Mahajan
Raksha Khadse, Girish Mahajansarkarnama
Published on
Updated on

Jalgaon MLC Election : जळगाव विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे. चर्चेतील अनेक नावे मागे पडून नंदकिशोर महाजन यांचे नाव कसे फायनल झाले यावर जळगावच्या राजकारणात उमेदवारी जाहीर झाल्यापासून खलबते सुरु आहे.

दरम्यान, आता याच मुद्द्यावर भाजपच्या दोन मंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्याचा निर्णय मंत्री गिरीश महाजनांचा असल्याचे मंत्री रक्षा खडसेंनी सांगितले. त्यावर गिरीश महाजनांनी हा निर्णय वरिष्ठांचा असल्याचे स्पष्ट करीत रक्षा खडसे यांचे असे सांगणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान जवळ आले आहे. १८ जूनला मतदान होणार आहे. त्यादृष्टीने प्रचार वेगात असून भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या प्रचारासाठी जळगाव शहरात १४ जून रोजी महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यानंतर मंत्री गिरीश महाजन व रक्षा खडसे या दोन्ही मंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Raksha Khadse, Girish Mahajan
MLC Election : जळगाव विधानपरिषदेत छाननीनंतर 16 उमेदवारांचे अर्ज वैध ; पण 'त्या' एका अर्जाने गिरीश महाजनांची वाढली धाकधूक

'नंदकिशोर महाजन यांना आपण उमेदवारी मिळवून आणल्यामुळे तुमचे राजकीय वजन वाढले आहे का?' असा प्रश्न रक्षा खडसे यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारला. त्यावर बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या, 'मी पक्षाची केवळ एक छोटी कार्यकर्ती आहे, जरी मी आज मंत्री असले तरी पक्षाने जो आदेश दिला, तो मान्य करणे ही आमची जबाबदारी आहे. उत्तर महाराष्ट्र असो वा जळगाव जिल्हा, येथील पक्षाचे सर्व महत्त्वाचे निर्णय गिरीश महाजन हेच घेतात. त्यामुळे नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीचा निर्णय देखील गिरीश महाजन यांनीच घेतला असल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या.

दरम्यान रक्षा खडसे यांच्या या विधानावर मंत्री महाजन यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. महाजन यांनी स्पष्ट केले की, नंदकिशोर महाजन हे पार्टीचे उमेदवार आहेत. दिल्लीतून वरिष्ठांनी त्यांचे नाव ठरवले आहे. कोणतीही उमेदवारी असो त्याचा अंतिम निर्णय हा नेहमी दिल्लीतून वरिष्ठांकडूनच घेतला जातो. नंदकिशोर महाजन हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्यावर माझा किंवा इतर कोणत्याही नेत्याचा शिक्का मारणे किंवा त्यांना 'गिरीश महाजनांचा उमेदवार' म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे, असं त्यांनी रक्षा खडसेंना सुनावलं.

Raksha Khadse, Girish Mahajan
MLC Election : महाजनांच्या पसंतीला डावलून वरिष्ठांनी जळगावचा उमेदवार ठरवला? भाजपत पडद्यामागे खरंच दुसरी टीम की 'फेक नॅरेटीव्ह'?

दरम्यान ऐरवी एखाद्या उमेदवाराला उमेदवारी मिळवून दिल्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ असते. मात्र जळगावात नंदकिशोर महाजनांच्या उमेदवारीचे श्रेय पक्षावर ढकल्यामागे नेमकं काय गौडबंगाल आहे, अशी चर्चा जळगावच्या राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहे. उमेदवारी डावलण्यात आलेल्यांची नाराजी ओढावली जावू नये म्हणून मंत्र्यांचा हा आटापिटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com