Ashram School News: सरकारचा मोठा निर्णय! आश्रमशाळेतील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी अन् निवडश्रेणी लागू; कुणाला होणार फायदा?

Ashram School Teachers Senior Pay Scale : राज्य सरकारने खासगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांतील पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणीचा लाभ मंजूर केला आहे. 12 व 24 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
Ashram School Teachers  Senior Pay Scale
Ashram School Teachers Senior Pay ScaleSarkarnama
Published on
Updated on
  1. 12 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ

  2. 24 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर

  3. राज्य सरकारच्या निर्णयामुळे हजारो शिक्षकांना आर्थिक फायदा होणार

Ashram School News: राज्यातील खासगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये कार्यरत शिक्षकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी मान्य करत शासनाने या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणीचा लाभ देण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतचा सरकराने अध्यादेश काढला आहे. या निर्णयामुळे आश्रम शाळांतील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शासनाच्या निर्णयानुसार, राज्यातील खासगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील पात्र शिक्षकांना सेवाकालाच्या निकषांनुसार वरिष्ठ वेतनश्रेणी तसेच निवडश्रेणीचा लाभ मिळणार आहे. यामध्ये 12 वर्षांच्या सेवेनंतर वरिष्ठ वेतनश्रेणी आणि 24 वर्षांच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू होणार आहे.

Ashram School Teachers  Senior Pay Scale
Maratha Students: मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! सारथीला 35 कोटी मंजूर, स्पर्धा परीक्षा, संशोधन, प्रशिक्षणाला मिळणार चालना

आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील आश्रमशाळांमध्ये कार्यरत शिक्षकांकडून ही मागणी दीर्घकाळ करण्यात येत होती. अनेक शिक्षकांनी आवश्यक सेवाकाल पूर्ण करूनही त्यांना संबंधित लाभ मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत होती. अखेर राज्य सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याने शिक्षकांच्या आर्थिक लाभाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Ashram School Teachers  Senior Pay Scale
Pune News: PMC च्या 5 शाळांसाठी 101 कोटींचा प्रस्ताव; खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध

या निर्णयामुळे राज्यभरातील उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील शिक्षकांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार असून, प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याने शिक्षक संघटनांनीही समाधान व्यक्त केले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आश्रमशाळांमधील शिक्षकांना इतर शासकीय आणि अनुदानित संस्थांतील शिक्षकांप्रमाणेच वेतनश्रेणीचे लाभ मिळणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com