

Jalgaon MLC Election : जळगाव विधानपरिषदेच्या जागेचा विषय सद्या शिवसेनेत चर्चेत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आपले पुत्र प्रताप यांच्यासाठी दावेदारी करत असतानाच पक्षाचे आमदार किशोर पाटील यांच्या गटाने त्यांचे पुत्र सुमित पाटील यांना पुढे करत विधानपरिषदेची दावेदारी मजबुत करण्यास सुरुवात केली आहे.
यातूनच शिवसेना शिंदे गटात या जागेवरुन ओढाताण सुरु असल्याचं दिसत आहे. यासंदर्भात किशोर पाटील यांनी आपली भूमिका माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मांडली आहे. ते म्हणाले, सुमितचं नाव चर्चेत आलं कारण त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका झाल्यात त्यात नगरपालिका निवडणुकीत मी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पाचोरा आणि भडगाव दोन्ही नगरपालिकांमध्ये जळगावकरांनी मला प्रचंड अशी साथ दिली. त्यामुळे दोन्ही नगरपालिकांमध्ये ऐतिहासिक विजय प्राप्त झाला.
जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त नगरसेवक हे पाचोरा व भडगाव नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे आहे. त्यामुळे साहजिकच सुमितने विधानपरिषद निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु ही जागा भारतीय जनता पक्षाकडे आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण जिल्ह्याचे पालकमंत्री व आमचे सगळ्यांचे नेते गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करुन ही जागा भाजपने शिवसेनेला सोडावी यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करु असे किशोर पाटील यांनी सांगितले.
कारण, जळगाव जिल्ह्यात पाच आमदार आणि एक माजी आमदार, एक माजी खासदार अशी ताकद जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची आहे. तर, भाजपचे बघायचे झाले तर त्यांच्याकडे दोन खासदार आहे. विधानपरिषद पण भाजपकडे. आम्ही आजवर प्रामाणिकपणे भाजपला साथ देत आलो म्हणूनच भाजपला हे शक्य झालं आहे. म्हणूनच भाजपने मोठा भाऊ म्हणून आमची मागणी त्यांनी मान्य केली पाहीजे. भाजपने ही जागा आम्हाला सोडावी अशी मागणी आम्ही मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत मीटींग घेऊन भाजपकडे करणार आहोत अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली.
भाजप तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय, उमेदवारांची नावे पुढे येत आहेत. यावर विचारलं असता आमदार किशोर पाटील म्हणाले, प्रत्येक पक्ष तयारीत असतो. प्रत्येक पक्षात नावांची चर्चा असते. त्यापद्धतीने भाजप देखील तयारीत आहे. पण, शेवटी राज्य पातळीवर आजून जागांच्या वाटाघाटी सुरु आहे,. त्यामुळे आम्हाला वाटते की, ही जागा शिवसेनेला सुटेल.
ही जागा शिवसेनेला सुटली तर मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आम्ही संपूर्ण ताकदीने ही जागा जिंकू. असा विश्वास किशोर पाटलांनी व्यक्त केला. भाजपने मोठा भाऊ म्हणून लहान भावाला ही जागा सोडली पाहीजे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सुरुवातीला गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यानंतर या जागेसाठी तुमचे पुत्र सुमित यांचे नाव इच्छुक म्हणून पुढे आले. यातून पक्षातील अंतर्गत मतभेद दिसत असल्याच्या प्रश्नावर किशोर पाटील म्हणाले की, इच्छा व्यक्त करणं किंवा इच्छुक असण ही चांगली गोष्ट आहे. आता भाजपमध्येही अनेक इच्छुक आहे मग त्यांच्यात अंतर्गत कलह आहे का तर अजिबात नाही.
तर, आमच्याकडे प्राबल्य आहे तसेच मताधिक्य आहे म्हणून इच्छुक आहे. आपल्याला कॉंग्रेस, राष्ट्रवादी, उबाठा यांचे कुणी इच्छुक दिसते का? अजिबात नाही कारण त्यांच्याकडे मताधिक्य नाही असं ते म्हणाले. भाजपमध्ये जसे चार दोन नेते इच्छुक तसे आमच्यातही आहे. शेवटी मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं किशोर पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.