Jalgaon Politics : जळगाव महापालिका आयुक्त पदभाराचा निर्णय लांबणीवर

जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची २९ नोंव्हेंबर रोजी शासनातर्फे अचानक बदली करण्यात आली होती
Jalgaon Politics
Jalgaon Politics
Published on: 
Updated on: 

Jalgaon Politics : जळगाव महापालिका आयुक्तपदाच्या पदभाराची सुनावणी आज ‘मॅट’मध्ये पूर्ण झाली आहे. निकाल राखीव ठेवण्यात आला असून येत्या तीन चार दिवसात तो लागण्याची शक्यता आहे.

जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची २९ नोंव्हेंबर रोजी शासनातर्फे अचानक बदली करण्यात आली होती. परभणी येथील महापालिका आयुक्त देविदास पवार यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. पवार यांनी ३० डिसेंबर रोजी जळगाव येथे दाखल होवून पदभार स्विकारला होता.त्यावेळी बदली झालेल्या आयुक्त डॉ.विदया गायकवाड या प्रशिक्षणासाठी पुणे येथे होत्या.

Jalgaon Politics
Satyajeet Tambe News : सत्यजित तांबे यांचेही काँग्रेसमधून निलंबन होणार; शिस्तपालन समितीची शिफारस

आपल्या पश्‍चात पदाचा एकतर्फी पदभार स्विकारल्याबाबत डॉ.विद्या गायकवाड यांनी आपल्या बदलीला आव्हाण देणारी याचिका मॅट (महाराष्ट्र ॲडमिनीसट्रेशन ट्रीब्युनल)मध्ये दाखल केली होती. त्यावर ‘मॅट’ने डॉ.गायकवाड यांच्या बदलीला स्थगिती दिली मात्र आयुक्तपदाचा पदभार देविदास पवार यांच्याकडेच ठेवला होता.

कायम पदभार देण्याबाबत सुनावणी सुरू होती, त्यावर आज पर्यत मॅट मध्ये एकूण सहा तारखा झाल्या आहेत. आजही सुनावणी होती, त्यावर आज निकाल येण्याची अपेक्षा होती, मात्र आज दोन्ही गटाची सुनावणी ‘मॅट’मध्ये पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र निकाल राखीव ठेवण्यात आला असून येत्या तीन ते चार दिवसात निकाल जाहिर होण्याची शक्यता आहे.

महापालिका आयुक्त देविदास पवार यांच्याकडे पदभार देण्यात आला असला तरी त्यांना कामाबाबत ‘मॅट’न्यायालयाने काही अटी शर्ती टाकल्या आहेत. त्यामुळे शहरातील इतर कामावरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून आयुक्तपदाचा पदभार ‘मॅट’कोणाकडे देणार याकडे लक्ष लागून आहे. आता या निकालाचा आणखीतीन ते चार दिवस जळगावकरांना आयुक्तपदी कोण राहणार याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.