Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांची 'राष्ट्रीय अध्यक्षपदावरील' निवड अवैध; राष्ट्रवादीच्याच नेत्याची नोटीस, पटेलांकडूनही अस्वस्थतेची कबुली

Sunetra Pawar: राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी देखील या नेत्यानं केली आहे. त्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Sunetra Pawar
Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. रितसर पक्षाचं अधिवेशन घेऊन त्यात पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पण आता सुनेत्रा पवार यांच्या निवडीला पक्षातीलच एका नेत्यानं आक्षेप घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक अवैध असल्याचा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी केला आहे. यासाठी त्यांनी पक्षाला चक्क वकिलामार्फत या अवैध निवडीसंदर्भात नोटीसही पाठवली आहे. या नोटिशीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

नेमका आक्षेप काय?

सचिद्दानंद सिंह यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीशीत म्हटलं की, अजित पवारांचं निधन २८ जानेवारी २०२६ रोजी झालं. यानंतर निवडणूक आयोगाला एक पत्र देऊन जोपर्यंत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जात नाही तोपर्यंत पक्षाचे हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात यावी, यासाठी त्यांच्याकडं सर्वाधिकार असतील. पण जेव्हा सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली तेव्हा प्रफुल्ल पटेल यांच्या नावानं निवडणूक आयोगाला पत्र देण्याऐवजी ते राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजभूषण श्रीवास्तव यांच्या नावे पत्र देण्यात आलं होतं. यावरच आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळं सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदी निवड, राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडच बेकायदा असल्याचा दावा सचिद्दानंद सिंह यांनी आपल्या नोटिशीत केला आहे.

Sunetra Pawar
MLA Ratnakar Gutte: 'तर आमदारकीचा राजीनामा देईल' म्हणत रत्नाकर गुट्टेंचं विरोधकांना ओपन चॅलेंज; 'धनगर समाज माझ्या सोबत' असल्याचा दावा

आक्षेप घेणारी व्यक्ती कोण?

सचिद्दानंद सिंह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे झारखंडचे प्रदेशाध्यक्ष आहेत. २६ डिसेंबर २०२३ रोजी कर्जतमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पाडली होती. पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली होती. या बैठकीत सचिद्दानंद सिंह यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. याच पदाच्या अधिकारांतर्गत सिंह यांनी थेट सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजभूषण श्रीवास्तव आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

सुधारणा आवश्यक :

या संदर्भात पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याशी सकाळने संपर्क साधला असता, पक्षात अस्वस्थता आल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच या पार्श्वभूमीवर पक्षात तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता असून त्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी पक्षातील अस्वस्थतेची कबुली दिल्याने नोटिशीचा परिणाम केवळ कायदेशीर वादापुरता मर्यादित नसून संघटनात्मक पातळीवरही असंतोष असल्याचे संकेत मिळतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com