Ajit Pawar Statue in Jalgaon : जळगावात अजित पवारांचा पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण

Sharad Pawar invited for the proposed unveiling of Ajit Pawar statue at Jalgaon District Bank : जिल्हा बँकेचा पुढाकार; ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात कार्यक्रम, पवारांनी निमंत्रण स्वीकारल्याची माहिती
Ajit Pawar Statue in Jalgaon
Ajit Pawar Statue in JalgaonSarkarnama
Published on
Updated on

NCP politics Maharashtra : पवार कुटुंबीयात राजकारणाचा वेगळा प्रवाह जळगाव जिल्ह्यात लवकरच दिसणार आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत दिवंगत उपमुख्यमंत्री (कै.) अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. जळगावच्या नेत्यांनी याबाबत पुढाकार घेतला.

जळगाव जिल्हा बँकेच्या आवारात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे अलावरण केले जाणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा कार्यक्रम होईल. त्यासाठी बँकेचे अध्यक्ष संजय पवार आणि उपाध्यक्ष आमदार अमोल पाटील यांनी पवार यांना मुंबईत त्यांचा निवासस्थानी निमंत्रण दिले. कार्यक्रमाला येण्याचे पवार यांनी मान्य केले आहे. या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात शरद पवार समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील सर्वच संस्थांवर भाजपचे (BJP) वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्या सल्ल्याशिवाय पानही हलत नाही. मात्र त्यांना शरद पवार समर्थकांकडून सातत्याने वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो.

Ajit Pawar Statue in Jalgaon
Pravin Swami soybean incident : दुष्काळाच्या मागणीवर शेतकरी आक्रमक; आमदार प्रवीण स्वामींवर सोयाबीन फेकले

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या बॅनरवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोटो लावला होता. त्यासाठी त्यांनी चक्क शरद पवार यांची परवानगी घेतली, असा दावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद देखील झाला होता.

Ajit Pawar Statue in Jalgaon
Rahul Bondre BJP Entry : राहुल गांधींचा फोन अन् पुढील काही तासांतच राहुल बोंद्रे ‘नॉट रिचेबल’; भाजप प्रवेशाला ब्रेक?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का अशी चर्चा काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात होती. त्यावर आता पडदा पडला आहे. अजित पवार पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनाच हे एकत्रीकरण गैरसोयीचे वाटत असल्याचा संदेश गेला होता.

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मात्र अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत आहे. या निमित्ताने महायुतीचा प्रभाव असलेल्या जिल्ह्याच्या राजकारणात आणि बँकेत देखील एक वेगळा प्रयोग पाहायला मिळेल का याची चर्चा या निमित्ताने घडते आहे.

सहकार आणि शेती या क्षेत्रावर जेष्ठ नेते शरद पवार यांचा सातत्याने प्रभाव राहिला आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक आणि कापूस उत्पादकांच्या पिक विम्याचा प्रश्न तीव्र आहे. या परिस्थितीत पवार यांनी शेती आणि दुष्काळ याविषयी निमंत्रण देण्यास गेलेल्या नेत्यांशी आवर्जून चर्चा केली. पिकांची माहिती घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com