Pravin Swami soybean incident : दुष्काळाच्या मागणीवर शेतकरी आक्रमक; आमदार प्रवीण स्वामींवर सोयाबीन फेकले

Farmers protest in Lohara demanding drought declaration; soybeans hurled at MLA Pravin Swami : लोहारा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर-बैलगाडी मोर्चा; महसूल अहवालावर आंदोलकांचे प्रश्न, स्वामी म्हणाले, ‘शेतकरी माझे आहेत’
Pravin Swami
Pravin SwamiSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv farmers protest : मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, शेतकऱ्यांच्या संतापाचे पडसाद लोकप्रतिनिधींवरही उमटताना दिसत आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर-बैलगाडी मोर्चादरम्यान उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्या दिशेने वाळलेले सोयाबीन फेकल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

लोहारा शहरात शेतकऱ्यांनी (Farmer) दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला होता. मोर्चेकरी तहसील कार्यालयाकडे जात असताना आमदार प्रवीण स्वामीही तेथे उपस्थित होते. तहसीलदारांना निवेदन देण्याच्या वेळी काही शेतकऱ्यांनी स्वामी यांना बाजूला करत आपला संताप व्यक्त केला.

लोहारा तालुक्यातील पर्जन्यमान आणि महसूल मंडळांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालावरून दुष्काळसदृश परिस्थिती नसल्याचा प्रशासनाचा निष्कर्ष असल्याचे वृत्त आहे. याच मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. महसूल मंडळांकडून पावसाचा अहवाल चुकीचा सादर करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. दुष्काळ जाहीर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी अधिक प्रभावी पाठपुरावा करायला हवा होता, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) आमदार स्वामी मोर्चात सहभागी होताच वातावरण तापले.

Pravin Swami
Sanjay Jadhav Cashew Almond Video : दुष्काळी बैठकीत काजू-बदामावरून वाद; भरणेंचं स्पष्टीकरण, जाधव म्हणाले...

आंदोलनादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी हातातील सुकलेली पिके आमदार स्वामी यांच्या दिशेने फेकली. त्यातील सुकलेल्या सोयाबीनची पेंडी त्यांच्या डोक्यावर पडल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, यापूर्वीही आमदार प्रवीण स्वामी यांनी मराठवाड्यातील शेतकरी प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला त्यांनी दुष्काळ, पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत सरकारकडे प्रश्न उपस्थित केल्याचे वृत्त आहे.

Pravin Swami
Kaju Badam Controversy : काजू-बदाम देतो, पण आमच्या बांधावर या! बुलढाण्यातील शेतकऱ्यांची मंत्र्यांना थेट हाक

घटनेनंतर आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबाबत संयमी भूमिका मांडली. “शेतकऱ्यांना माझ्यावर रोष व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यांनी मला निवडून दिले आहे. त्यांचे माझ्याकडून काही असमाधान झाले असेल,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आपण यापूर्वीच केली असून, सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे स्वामी यांनी सांगितले. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

“ज्यांनी माझ्यावर सोयाबीन फेकले त्यांच्यावर मी नाराज नाही. तो त्यांचा अधिकार आहे. मी शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकरी माझे आहेत,” असेही स्वामी यांनी सांगितले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही मांडल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्वामी यांनी स्पष्ट केले.

दुष्काळाच्या प्रश्नावर आता सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

उमरगा-लोहारा परिसरात यापूर्वीही शेतकरी प्रश्नांवर आंदोलने आणि मदतीच्या मागण्या झाल्या आहेत. अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना 86 कोटी रुपयांहून अधिक मदत मंजूर झाल्याचेही यापूर्वी वृत्त आले होते. आता लोहारा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीवर प्रशासन आणि राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com