Vidyanand Bapat Attack: पुणे डीजे प्रकरण; संतप्त रोहिणी खडसे म्हणाल्या, बापट यांच्यावरील हल्ला हा तर 'सरकार पुरस्कृत अतिरेक'

Jalgaon NCP Rohini Khadse Pune DJ case Khadse criticizes Chief Minister -विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यामुळे राज्य सरकारवर विरोधकांनी चौफेर टीकेची झोड उठविली आहे.
Devendra-Fadnavis & Rohini Khadse
Devendra-Fadnavis & Rohini KhadseDevendra-Fadnavis & Rohini Khadse
Published on
Updated on

Rohini Khadse News: पुण्यातील गणेशोत्सवात डीजेचा वाद आता चांगलाच पेटला आहे. त्याच्या प्रतिक्रिया राज्यभर उमटू लागल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे.

पुणे शहरातील गणेशोत्सवात `डीजे` चा वापर करू नये. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी आवाज उठविला आहे. त्याच्या अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही प्रतिक्रिया पुणे शहरात उमटल्या. बापट यांनी हा विषय चांगलाच उचलून धरला आहे. 

या प्रश्नावरून वातावरण तापले असताना बापट यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानिमित्ताने बापट यांच्या समर्थनासाठी राज्यातील विरोधी पक्ष पुढे आल्याचे चित्र आहे. 

Devendra-Fadnavis & Rohini Khadse
Vidyanand Bapat Assault Case : विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्याची ओळख पटली; गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष, हल्ल्यामागचे कारण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी यासंदर्भात राज्य सरकारच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विद्यानंद बापट हे पुणेकरांची बाजू आणि समस्या मांडत आहेत. असे असताना त्यांच्यावर झालेला हल्ला हा प्रशासकीय अपयश म्हटले पाहिजे. 

Devendra-Fadnavis & Rohini Khadse
Vidyanand Bapat : धक्कादायक! पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना बेदम मारहाण

श्री. बापट यांच्यावर झालेला हल्ला हा सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचा आरोप खडसेयांनी केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्याचा धाक राहिला की नाही असा गंभीर प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. 

विद्यानंद बापट यांची भूमिका मान्य नसल्यास त्याला विचारांच्या पातळीवर उत्तर दिले पाहिजे. राज्यात अनेक ठिकाणी ध्वनी प्रदूषण आणि डीजेचा त्रास झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यावर बापट यांनी विचारपूर्वक आपली भूमिका मांडली आहे. मान्य नसल्यास त्याला वैचारिक विरोध करावा. मात्र हल्ल्याचे कधीही समर्थन होऊ शकणार नाही. 

गुरुवारी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही बापट यांच्यावरील झालेल्या हल्ल्याचा निषेध केला होता. या निमित्ताने राज्य सरकारचा आणि पोलिसांचा दुटप्पीपणा स्पष्ट होतो. अनेक मतदारसंघात डीजे आणि ध्वनी पातळी सोयीनुसार वाढलेली व तिला पोलिसांची परवानगी सहज मिळत असल्याचे चित्र आहे. कायदा सगळीकडे सारखाच अमलात आणला पाहिजे, असे ठाकरे म्हणाले होते. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com