Jalgaon News : उन्मेष पाटलांचा गिरिश महाजनांवर गंभीर आरोप; ...ते तर लुटारु गॅंगचे प्रमुखच

Unmesh Patil रामदेववाडी येथील अपघातात चार जणांचा जीव गेल्यानंतर सुद्धा अपघाताला जबाबदार असलेल्याना हे मंत्री पाठीशी घालत असल्याचा आरोप ही उन्मेष पाटील यांनी केला आहे.
Girish Mahajan, Unmesh Patil
Girish Mahajan, Unmesh Patilsarkarnama

Jalgaon News : जिल्हा बँक शेतकऱ्यांची फसवणूकच करत असून मंत्री गिरीश महाजन यांनीच तोडाफोडीचे राजकारण करून या जिल्हा बँकेत फसवणूक करणारे नेते बसवले आहेत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या लुटारू गँगचे प्रमुख गिरीश महाजन आहेत, असा गंभीर आरोप माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे.

मंत्री गिरिश महाजन यांच्यावर उन्मेष पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. उन्मेष पाटील यांनी म्हटलं की, पीक विमा असो की कर्ज पूनर्गठण असो यामध्ये जिल्हा बँक शेतकऱ्यांची फसवणूकच करत आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी तोडाफोडीचे राजकारण करून या जिल्हा बँकेत फसवणूक करणारे नेते बसवले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांची लुबाडणूक होण्यास जसे हे नेते जबाबदार आहेत, तशाच पद्धतीने त्यांना त्या पदावर बसविणारे मंत्री गिरीश महाजन देखील जबाबदार आहेत. ते या गँगचे प्रमुख आहेत, असा खळबळ जनक आरोप उन्मेष पाटील यांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा समस्यांकडे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

Girish Mahajan, Unmesh Patil
Girish Mahajan : संकटमोचक गेले कुठे?; नाशिक-दिंडोरीच्या प्रचारातून गिरीश महाजन गायब!

आता निवडणूक संपली असल्याने यांनी शेतकऱ्यांच्यासाठी तातडीने पीक विमा मिळण्यासाठी, कर्ज मिळण्यासाठी, शेतीमालाला भाव मिळवून देण्यासाठी काम केले पाहिजे. नाही तर शेतकऱ्याचा उद्रेक त्यांना पाहायला मिळेल.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

आम्ही सुध्दा शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे. रामदेववाडी येथील अपघातात चार जणांचा जीव गेल्यानंतर सुद्धा अपघाताला जबाबदार असलेल्याना हे मंत्री पाठीशी घालत असल्याचा आरोप ही उन्मेष पाटील यांनी केला आहे.

Edited By : Umesh Bambare

Girish Mahajan, Unmesh Patil
Jalgaon Loksabha News : जळगावात मतांचा टक्का वाढला; सत्ताधाऱ्यांना ठरणार घातक..?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com