Jalgaon Mahayuti conflict latest updates: जळगाव जिल्ह्यात प्रस्तावित चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रावरून महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा आणि भडगाव तालुके चाळीसगावच्या प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.
या निर्णयाविरोधात आवश्यक असल्यास जनआंदोलन, जेलभरो आंदोलन उभारू, एवढेच नव्हे तर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला तरी मागे हटणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. चाळीसगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास आपला विरोध नसून, पाचोरा आणि भडगाव तालुके त्या कार्यालयाशी जोडण्यासच विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी किशोर पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर टीका करत, "एका आमदाराचा हट्ट पूर्ण करण्यासाठी पाचोरा आणि भडगावमधील नागरिकांना ७० ते ८० किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करण्यास भाग पाडू नये," असे मत व्यक्त केले.
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी म्हणून मंगेश चव्हाण सध्या या प्रकरणावरुन चर्चेत आहेत. चाळीसगावच्या राजकारणावर त्यांनी आपली पकड निर्माण केली आहे. मात्र त्यांना विरोधकांऐवजी महायुतीतूनच अडचणी निर्माण केल्या जात आहेत.
या मुद्द्यावरून महायुतीतील दोन आमदारांमध्ये पुन्हा संघर्षाची चिन्हे दिसू लागली असून, आगामी काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील या प्रशासकीय निर्णयाला आता राजकीय रंग चढल्याची चर्चा सुरू आहे.
अपर जिल्हाधिकारी कार्यालयावरून वाद: पाचोरा-भडगाव तालुके चाळीसगावच्या प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर पाटील यांचा तीव्र विरोध.
राजीनाम्याचा इशारा: गरज पडल्यास जनआंदोलन, जेलभरो आंदोलन आणि आमदारकीचा राजीनामाही देईन, मात्र मतदारसंघावर अन्याय होऊ देणार नाही, असा पाटील यांचा इशारा.
महायुतीतील संघर्ष तीव्र: या मुद्द्यावरून किशोर पाटील आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील मतभेद उघड झाले असून, महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.