Jalgaon politics : जळगावच्या रणांगणात नवा खेळाडू ; दोन्ही आघाड्यांना झुंज देण्यासाठी तिसरीच आघाडी मैदानात

Jalgaon politics : सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली आहे. भाजप किंवा महाविकास आघाडी सोबत न जाता तिसरी आघाडी म्हणून लढणार आहे.
Jalgaon politics ,सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया
Jalgaon politics Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon politics : महाविकास आघाडी ही भाजपची बी-टीम आहे. त्यातले बरेच बरेच लोक भाजपच्या दावणीला बांधलेले आहेत. भाजप लहान मोठ्या प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा प्रयत्न करत आहे. तर कॉंग्रेस अद्याप घराणेशाही विचारातून बाहेर पडलेला नाही, अशी टीका करत जळगावात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तिसरी आघाडी मैदानात उतरली आहे.

सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे. कमीत कमी ५० टक्के जागा लढवणार असल्याची माहिती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजहर तांबोळी यांनी दिली. जळगावात रविवारी पत्रकारपरिषद घेत त्यांनी ही घोषणा केली.

सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाची जिल्हा कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी पार्टीने केली आहे. भाजप, संघ, संघ विचारसरणी आणि एनडीए सोडून इतर पक्षांशी आम्ही चर्चा करीत आहोत. तिसरी आघाडी म्हणून आम्ही मैदानात उतरण्याचा विचार करीत आहोत असे प्रदेशाध्यक्ष तांबोळी यांनी सांगितलं.

Jalgaon politics ,सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया
Girish Mahajan Politics : खडसेंविरोधात आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी हद्द ओलांडली ; गिरीश महाजन म्हणाले, हे योग्य नाही..

तांबोळी म्हणाले, जळगावात मुलभूत सोयी-सुविंधाचा अभाव आहे. आम्ही वर्षापासून काम करीत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवटवर्तीय व भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावातील अडचणी वाढविल्या. राज्यात गढूळ वातावरण निर्माण झालं आहे. इडीमुळे पक्ष बदलाची परंपरा सुरु झाली आहे.

महाराष्ट्रात दररोज किमान आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र त्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. मुलभूत सुविधा आहे किंवा नाही याकडे कुणी बघायला तयार नाही. ग्रामीण भागाचा विकास झाला, तरच राज्याचा विकास होईल. रस्ते, पाणी, गटार या मुलभूत सोयीसुविधा आणि धर्मनिरपेक्ष विकास यावर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत अशी माहिती तांबोळी यांनी दिली.

Jalgaon politics ,सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया
BJP MLA : भाजप आमदाराला ड्रायव्हिंगची भलतीच हौस, यापूर्वी घाटात ट्रक आणि आत्ता एसटी बसही चालवली

कार्यकारिणीत कोण?

रविवारी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाची जळगावात बैठक झाली. त्यात जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात मतीन देशपांडे यांना अध्यक्ष करण्यात आलं आहे. तर उपाध्यक्ष कासीम नदवी, सचिव अरबाज शेख, सचिव सोहेल शेख, चिराकुद्दीन शेख, सदस्य. अमीन पटेल, अल्ताफ असगर, अबुजर मिर्झा, हादी अन्सारी, जुनेद शेख, सय्यद जुनेद यांची निवड करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com