Jalgaon News : जळगावात शिवसेनेचा नेता गोत्यात ; फार्म हाऊसवर सुरु होतं धक्कादायक कृत्य, पोलिसांची अचानक धाड

Lalit Kolhe Arrest : जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी रविवारी अचानक धाड टाकली. पोलिसांच्या या कारवाईत धक्कादायक बाब समोर आली आहे.
Lalit Kolhe Arrest
Lalit Kolhe Arrest Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर काल पोलिसांनी छापा टाकला. शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर ममुराबाद रोडवरील त्यांच्या एल. के. फार्म हाउसवर आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचा अड्डा चालविला जात असल्याचा उलगडा झाला आहे. येथील बनावट कॉल सेंटर पोलिसांनी अखेर उद्ध्वस्त केलं आहे. फार्म हाउसचे मालक माजी महापौर ललित विजयराव कोल्हे यांच्यासह आठ संशयितांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली. ललित कोल्हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सक्रीय आहेत.

बेकादेशीर ऑनलाइन कॉल सेंटर किंवा सट्टा वेटिंग चालवली जात असल्याच्या माहितीवरून जळगाव पोलिसांनी छापा टाकला. सहा तास चाललेल्या पोलिसांच्या कारवाईत सुरुवातीला सायबर तज्ज्ञांना दोन लॅपटॉप आढळले. त्या लॅपटॉपद्वारे परदेशी नागरिकांना संपर्क करून फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर फॉर्म हाऊसमधून तब्बल 31 लॅपटॉप 7 मोबाईल्स जप्त करण्यात आले आहेत.

तब्बल 25 ते 30 जणांचा स्टाफ या कॉल सेंटरमध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामध्ये पश्चिम बंगाल (कोलकाता) येथील मूळ रहिवासी असलेल्या चौघांसह मुंबईतील काही तरुणांसह एक विविध परदेशी भाषा बोलता येणारी तरुणी अशा 25 ते ३० जणांचा समावेश आहे. त्यापैकी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान चौकशीत इतर काम करणारे वीकेंड (शनिवार रविवार) जोडून सुटी आल्याने आपल्या गावी निघून गेले होते. ते सोमवारी (ता. २९) कामावर येणार असल्याचे सांगण्यात आले.

Lalit Kolhe Arrest
Girish Mahajan : पूर्वी जे झालं ते झालं, आता भ्रष्टाचार होऊ देणार नाही; मंत्री महाजन नेमकं कशाबद्दल बोलले?

पोलिसांच्या या कारवाईनंतर जळगावच्या राजकीय वर्तुळात पूर्णपणे खळबळ उडाली. असं काही सुरु असेल अशी कुणाला कल्पना देखील नव्हती. या कॉल सेंटरच्या माध्यमातून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नावाने परदेशी व भारतातील नागरिकांना संपर्क करून त्यांची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात येत होती. या प्रकरणाची माहिती मिळाल्याबरोबर पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षकांनी कारवाईसाठी पावले उचलली. पोलिसांनी कर्तव्य दक्षता दाखवत कोणताही मुलाहिजा न ठेवता केलेल्या कठोर कारवाईने पोलिसांचे कौतुक होत आहे.

Lalit Kolhe Arrest
Raj Thackeray Leader : राज ठाकरेंच्या ढाण्या वाघाने भाजपला तडातडा तोडलं, सगळे बघतच राहिले

यांना केली अटक

याप्रकरणात, ललित विजयराव कोल्हे (रा. कोल्हेनगर, जळगाव), नरेंद्र चंद् अगारिया, राकेश चंदू अगारिया, शाहबाज आलम, शाकिब आलम (चौघे रा. कोलकाता, पश्चिम बंगाल), जिशान नुरी, हाशीर रशीद यांच्यासह स्वयंपाकी (कूक) व गुन्ह्यात सहभागी अलीभाई याला अटक केली आहे. यांच्याव्यतिरिक्त अकबर, आदील, इम्रान हे तिघेही मुंबईहून हा सर्व अड्डा ऑपरेट करीत असल्याचे समोर आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com