Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं विमान उशिरा उडालं, पण त्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले, नेमकं काय घडलं?

Eknath Shinde Jalgaon visit, flight delay incident, woman’s life saved due to delayed takeoff : एकनाथ शिंदे जळगाव विमानतळावर पोहचल्यानंतर तेथील वैमानिकाने विमान उड्डान करण्यास थेट नकार दिला. पण त्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर होते. दौरा पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईला रवाना होण्यासाठी निघाले. मात्र, जळगाव विमानतळावर पोहचल्यानंतर तेथील वैमानिकाने विमान उड्डान करण्यास थेट नकार दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे विमान जळगाव विमानतळावर रखडल्याचे पाहायला मिळाले. तब्बल एक तास उशिराने विमान उड्डाणाला परवानगी मिळाली. मात्र, उपमुख्यमंत्र्यांचा हा विलंब जामनेर तालुक्यातील एका महिलेच्या जीवनासाठी उपयोगी आला.

संत मुक्ताई आषाढी वारीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनानुसार त्यांनी कार्यक्रम आटोपून सायंकाळी सात वाजे पर्यंत विमानतळावर पोहोचणे अपेक्षित होते. तेथून ते खासगी विमानाने रात्री आठ वाजेपर्यंत मुंबईला पोहोचणार होते. मात्र, जळगावच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांना रात्रीचे आठ वाजले. कार्यक्रम आटोपून शिंदे विमानतळावर पोहोचले. मात्र, एन वेळेस पायलटने उड्डाण भरण्यास नकार दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, 'एटीसी'ची परवानगी नसल्याने पायलटने उड्डाण भरल्यास नकार दिला. कारण एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) च्या वेळेनुसार रात्री 8 वाजता इतरत्र उड्डाणांची वेळ असल्याने मुंबईत लँडिंगला परवानगी नव्हती. परिणामी, पायलटने थेट विमान उड्डाणास नकार दिला. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. एकनाथ शिंदेंना रात्री उशिरा पर्यंत विमानतळावर ताटकळत राहावं लागलं.

Eknath Shinde
Nashik Thackeray Group : नाशिकच्या ठाकरे गटात स्फोटक घडामोडी, मातोश्रीवर विलास शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे नाराजीचं वादळ अधिकच गडद

दरम्यान मंत्री गिरीश महाजन आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर तोडगा काढण्यासाठी वैमानिकाशी संवाद साधला. पायलटची अडचण त्यांनी समजून घेतली. विमान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला. याच दरम्यान एअर ट्रॅफिक कंट्रोलशीही बोलणे सुरू होते. या सर्व प्रक्रियेला पाऊण तास गेल्यानंतर विमान उड्डाणाला परवानगी मिळाली आणि शिंदे जळगावहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, त्यांचा दौरा आणि त्या दौऱ्याला झालेला विलंब एका महिलेचा जीव वाचविणारा ठरला आणि विलंब होऊनही त्यांचा दौरा सत्कारणी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Eknath Shinde
Manikrao Kokate-Rajabhau Waje : विधानसभेला ठेच लागली, सिन्नर मध्ये उदय सांगळे आता एकटेच भिडणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमान उड्डाणास झालेल्या विलंब जामनेर तालुक्यातील शीतल आनंद बोरडे-पाटील या महिलेचे प्राण वाचवणारा ठरला आहे. या महिलेचे किडनी ट्रान्सप्लांट मुंबईत होणार होते. मात्र त्यासाठी तासाभरात मुंबईला पोहचणे आवश्यक होते. मात्र तासाभरात मुंबईला कसे जाणार? त्यासाठी कुठलाही पर्याय नव्हता. दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विमान उड्डाणाला परवानगी न मिळाल्याने ते थांबून होते. ही बाब गिरीश महाजन आणि इतरांच्या लक्षात आली. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या विमान उड्डाणाला परवानगी मिळताच त्यांनी तातडीने रुग्ण महिलेला उपमुख्यमंत्र्यांच्या विमानात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरा ही महिला मुंबईत दाखल झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com