Nashik Thackeray Group : नाशिकच्या ठाकरे गटात स्फोटक घडामोडी, मातोश्रीवर विलास शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे नाराजीचं वादळ अधिकच गडद

Vilas Shinde skips Matoshree meeting with Uddhav Thackeray, sparks speculation in Thackeray group Nashik : सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्यानंतर नाशिकमध्ये ठाकरे गटात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. शुक्रवारी नाशिकमधील ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले.
Vilas Shinde, Uddhav Thackeray
Vilas Shinde, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik Thackeray group : सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्यानंतर नाशिकमध्ये ठाकरे गटात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. शुक्रवारी नाशिकमधील ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले. ठाकरे गटाचे सगळे प्रमुख पदाधिकारी मातोश्रीवर गेले, मात्र विलास शिंदे त्यांच्यासोबत नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

सुधाकर बडगुजर यांनी आपण स्वत: नाराज आहोतच शिवाय, महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह पक्षातील दहा ते बारा जण नाराज असल्याचा दावा केला होता. बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे. त्यांच्या जागी दत्ता गायकवाड यांच्यावर उपनेते पदाची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी सोपवली आहे.

शुक्रवारी गायकवाड यांच्यासह जिल्हा प्रमुख डी. जी सूर्यवंशी, सुनील बागुल, माजी आमदार वसंत गिते, उप महानगर प्रमुख बाळा दराडे आणि इतर पदाधिकारी मातोश्रीवर उपस्थित होते. मात्र विलास शिंदे या सगळ्या सोबत गेले नाहीत. कौटुंबिक कारणामुळे ते मातोश्रीवर येऊ शकले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

Vilas Shinde, Uddhav Thackeray
Manikrao Kokate-Rajabhau Waje : विधानसभेला ठेच लागली, सिन्नर मध्ये उदय सांगळे आता एकटेच भिडणार

विलास शिंदे यांच्या लेकीच्या लग्नसोहळ्यासाठी खास एकनाथ शिंदे आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी बोलताना शिंदे आहेत, शेवटी शिंदेकडेच जाणार असं विधान केलं होतं. त्यामुळे शिंदे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर बडगुजर यांनीही पत्रकारपरिषदेत शिंदे देखील नाराज असल्याचं सांगितलं होतं.

बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली त्यावेळी त्या बैठकीला विलास शिंदे देखील उपस्थित होते. मात्र, त्यांनी त्यावेळी आपण ठाकरे गट सोडणार नसल्याचे वृत्त फेटाळले नव्हते. त्यानंतर आज विलास शिंदे मातोश्रीवरी उद्धव ठाकरे यांना भेटायला न आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Vilas Shinde, Uddhav Thackeray
BJP Politics : यंदा भाजपचं मोठं टार्गेट, नुसतं नाशिकच नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या चारही महापालिका ताब्यात घेण्याचा निर्धार

विलास शिंदे हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर विलास शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहीले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर महानगरप्रमुख पदाची जबाबदारी दिली. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने महानगरप्रमुखाची भूमिका महत्वाची असते. अशात शिंदे यांनी नाराजीमुळे पक्षाची साथ सोडल्यास त्याचा फटका पक्षाला बसू शकतो. शिंदे यांच्यासोबत काही माजी नगरसेवक देखील पक्षाची साथ सोडू शकतात. परिणामी शिंदे गटाला त्याचा चांगला फायदा होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com