Jayant Avhad : भाजप नेते जयंत आव्हाड यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल

BJP leader Jayant Awad : या व्हिडिओमध्ये आव्हाड यांनी भाजप कार्यालयातच एका युतीला दमबाजी केली होती. अर्वाच्य शिवीगाळ देखील केली होती.
Jayant Avhad
Jayant AvhadSarkarnama
Published on
Updated on

Nashik BJP News : भाजपचे सिन्नर तालुका अध्यक्ष जयंत आव्हाड चांगलेच अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

'पार्टी विथ डिफरन्स' असलेल्या भाजपच्या सिन्नर तालुका अध्यक्ष आव्हाड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये आव्हाड यांनी भाजप कार्यालयातच एका युतीला दमबाजी केली होती. अर्वाच्य शिवीगाळ देखील केली होती.

गेल्या मंगळवारी हा प्रकार घडला होता. संबंधित युवतीने आपल्या आईला याबाबत माहिती दिली. त्यानंतर युतीच्या आईला देखील आव्हाड यांनी दमबाजी केली होती. त्यामुळे संबंधित मायलेकींनी मंगळवारी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

मात्र पोलिसांनी (Police) राजकीय दबावामुळे कारवाई केली नव्हती. आता हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्याच्या बातम्या ही प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे आव्हाड चांगलेच अडचणीत आले आहेत.

Jayant Avhad
Anti Corruption Bureau : नगरचे आयुक्त जावळे लाचेच्या जाळ्यात; भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडले

याबाबत शिवसेना (Shivsena) नेत्या सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ एक्स वर अपलोड केला होता. पोलीस कारवाई करणार की नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याबाबत भाजपवरही टीका केली. या सगळ्या दबावानंतर आज आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

आता आव्हाड चांगलेच अडचणीत आले आहेत. जयंत आव्हाड (Jayant Avhad) यांच्यावर पोलीस काय कारवाई करते? त्यांना अटक करते की नाही? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Jayant Avhad
Vinod Tawde : नगर विधानसभा भाजप लढवणार, विनोद तावडेंचे संकेत; अजित पवार यांच्या गोठात अस्वस्थता

दरम्यान सिन्नर आणि नाशिकच्या राजकीय कार्यकर्ते आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही या प्रकारावर अतिशय संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी संबंधित वादग्रस्त पदाधिकारी आव्हाड यांना बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com