JDCC Bank Election : जळगावात उन्मेष पाटील ठाण मांडून बसले, अधिकाऱ्यांवर भडकले ; मतदान केंद्रावर खडाजंगी, नेमकं काय घडलं?

Unmesh Patil Objects to Voters' Accompanying Persons in Chalisgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या मतदानादरम्यान चाळीसगावमध्ये शिवसेना नेते उन्मेष पाटील आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
Unmesh Patil, JDCC Bank Election
Unmesh Patil, JDCC Bank ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. एकुण २१ पैकी १२ जागा आधीच महायुतीने बिनविरोध केल्या आहेत. आज उर्वरित 9 जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान या निवडणुकीत चाळीसगाव मधील लक्ष्यवेधी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

चाळीसगावात भाजप महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नारायण पाटील व विजय पाटील या दोघांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे चाळीसगावची लढत चुरशीची बनली आहे. निवडणुकीत महायुती असूनही चाळीसगावात भाजप-शिवसेनेत वाद रंगला आहे. बंडखोर उमेदवारांच्या बूथवर शिवसेना नेते उन्मेष पाटील ठाण मांडून बसल्याने महायुतीत धुसफूस सुरु आहे.

या दरम्यान आता चाळीसगाव मतदान केंद्रावर उन्मेष पाटील आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे वृत्त आहे. मतदान केंद्रात आलेल्या दोन मतदारांकडे 'अनफिट सर्टिफिकेट' नसल्याने त्यांच्यासोबत आलेल्या दोन व्यक्तींवर उन्मेष पाटील यांनी हरकत घेतली. यावरुनच हा वाद पेटल्याचे सांगितले जात आहे.

Unmesh Patil, JDCC Bank Election
JDCC Bank Election : मंत्री रक्षा खडसेंच्या प्रोटोकॉलवर आमदार चंद्रकांत पाटलांचा आक्षेप, थेट SP ला फोन; मतदानादरम्यान दोन्ही नेते आमनेसामने!

उन्मेष पाटील यांनी हरकत घेतल्याने मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांसोबत त्यांची शाब्दिक चकमक झाली. यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव निवळल्याचे पाहायला मिळाले.

चाळीसगाव सोसायटी मतदार संघामध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटातील दोन बंडखोर उमेदवारांनी अर्ज माघारी न घेतल्याने निवडणूक होत आहे. या दोन्ही उमेदवारांना उन्मेष पाटील यांचे पाठबळ असल्याचे सांगितले जाते. मंगेश चव्हाण व उन्मेष पाटील यांच्यात राजकीय वाद आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली आहे. चव्हाण यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

Unmesh Patil, JDCC Bank Election
JDCC Bank Election : चाळीसगावात बंडखोरांच्या बूथवर पोहोचले उन्मेष पाटील, जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मतदानाच्या दिवशी महायुतीत तणाव

उन्मेष पाटील हे स्वत: बूथवर उपस्थितीत होते, अशातच त्यांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची झाल्याने महायुतीमध्ये तणाव आणखीनच वाढल्याचे दिसत आहे. उद्या मतमोजणी पार पडणार असून त्यामुळे चाळीसगावच्या निवडणुकीत निकाल काय लागतो याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.