

Jalgaon DCC Bank Election, Chandrakant Patil Objects to Raksha Khadse's Security Protocol : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज (दि. २९) मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. मुक्ताईनगर मतदान केंद्रावर भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं.
जळगाव जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. दरम्यान रक्षा खडसे यांच्या प्रोटोकॉलवर चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. या माध्यमातून मतदारांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पोलीस अधिक्षकांना फोन करुन त्यांनी नाराजी व्यक्त करत तक्रार केली आहे.
माझ्या माहितीप्रमाणे उद्या डिलिमिटेशन आहे, केंद्रीय मंत्री आज तिथे गेले पाहिजे होत्या, पण त्या इथे आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच रक्षा खडसे यांचे तीन ठिकाणी मतदान असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
दुसरीकडे, हा प्रोटोकॉल शासनाकडून सुरक्षेसाठी मिळालेला असून तो माझ्यासोबत असण्यात गैर काय, असा सवाल रक्षा खडसे यांनी उपस्थित केला. तसेच तीन ठिकाणी मतदान असल्याच्या चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपावर रक्षा खडसे म्हणाल्या, ते सतत आरोप करत असतात. त्यांनी त्यांचीही यादी पाहावी, एका व्यक्तीने किती वेळा मतदान केलंय ते पाहावे. असे अनेक मतदार आहेत, ज्यांचे पाच-पाच सहा-सहा ठिकाणी मतदान आहे. या सहकारच्या निवडणुकीत तसे बंधन नसते असं रक्षा खडसे म्हणाल्या.
त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचं चित्र आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बॅंक खडसे मुक्त करण्याचा नारा दिला आहे. त्यांनी रक्षा खडसे यांच्या ठरावांवर देखील हरकत घेतली होती. मात्र, त्यांची हरकत फेटाळण्यात आली. रक्षा खडसे यांच्याविरोधात त्यांनी देवयानी देशमुख यांना रिंगणात उरवलं आहे. त्यामुळे भाजप -शिवसेनेत या मतदारसंघात मोठा तणाव असून या निवडणुकीत रक्षा खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.