ACB News : सरपंचाकडून लाच घेताना जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायकास अटक; निलंबनाची कारवाई!

Bribe News : सभा मंडपाच्या वर्क ऑर्डरसाठी मंजूर निधीतून दीड टक्के रकमेच्या लाचेची केली होती मागणी
Acb Action In Nagar
Acb Action In NagarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : आमदार निधीतून मंजूर झालेल्या सभा मंडपाच्या वर्क ऑर्डरसाठी सरपंचाकडून लाच घेताना जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागातील कनिष्ठ सहायकाला पकडले आहे. कनिष्ठ सहायक संतोष बाळासाहेब जाधव (वय 39, रा. विद्या काॅलनी, कल्याण रोड, नगर) असे पकडलेल्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नगर कार्यालयातील पथकाने ही कारवाई केली.

तक्रारदार नगर तालुक्यातील जांभळी गावच्या सरपंच आहेत. गावासाठी आमदार निधीतून 15 लाख रुपयांचा सभामंडप मंजूर झाला आहे. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीने प्रशासकीय मान्यता दिली. या कामाच्या वर्क ऑर्डरसाठी जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाकडे प्रस्ताव होता. यावर अजून वर्क ऑर्डर झालेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Acb Action In Nagar
Pathardi Farmers : दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे साकडे; केली मोठी मागणी...

तर आता जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागातील कनिष्ठ सहायक जाधव याने सभा मंडपाच्या वर्क ऑर्डरसाठी मंजूर झालेल्या निधीतून दीड टक्के रकमेच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे.

सरपंच यांनी याबाबत शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नगर कार्यालयाकडे तक्रार केली. यावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नगर कार्यालयातील पथकाकडून तत्काळ पडताळणी करण्यात आली.

कनिष्ठ सहायक जाधव याने लाचेची रक्कम लगेच स्वीकरण्याची तयारी केली. यावर लाचलुचपत पथकाने सापळ्याची कार्यवाही केली. जाधव याने तक्रारदार आणि पंचासमक्ष 23 हजार रुपये लाचेची मागणी केली. यात तडजोड होऊन 22 हजार 500 रुपये लाचेची रक्कम स्वीकारली.

Acb Action In Nagar
Eknath Khadse : ''... मग बुटानं मारलं पाहिजे की नाही?'' म्हणत खडसेंनी व्यक्त केला संताप!

लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच लाचलुचपतच्या पथकाने जाधव याला पकडले. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नगर कार्यालयाचे उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, पोलिस कर्मचारी संतोष शिंदे, बाबासाहेब कराड, सचिन सुद्रुक, हारून शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com