Aditya Thackeray On Eknath Shinde : 'शिंदे गटाने 'जागतिक गद्दार दिन' साजरा करावा' ; आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं!

Aditya Thackeray On Shivsena Vardhapan Din : शिंदेंच्या गद्दारीची दखल ३३ देशांनी घेतली आहे.
Aditya Thackeray Eknath Shinde
Aditya Thackeray Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Vardhapan Din News : १९ जून हा शिवसेना या राजकीय पक्षाचा वर्धापन दिन आहे. यंदाचा वर्धापन दिन हा शिवसेनेसाठी अनेक अर्थांनी वेगळा आहे. शिवसेनेत फूट पडून शिवसेनेचे दोन गट निर्माण झाल्यानंतर पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. शिवसेनेच्या दोन गटांचे दोन वेगवेगळे वर्धापनदिन साजरे होणार आहेत. दोन्ही गटांकडून वर्धापन दिनाची जय्यत तयारी केली गेली आहे. मात्र यावरून आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिवसेना शिंदे गटावर बोचरी टीका केली आहे. (Latest Marathi News)

Aditya Thackeray Eknath Shinde
CM Shinde Meet Bansode: मुख्यमंत्री शिंदेंना बोलावले शिवसेना खासदारांनी; मात्र, चर्चा झाली राष्ट्रवादीच्या आमदाराची

शिवसेना ठाकरे गटाचे नेते व युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. "शिंदे गटाने वर्धापनदिन साजरा करण्यापेक्षा 'जागतिक गद्दार दिन साजरा' करावा, असा खोचक टोला आदित्य यांनी लगावला आहे. शिंदे गटाच्या गद्दार लोकांची नोंद जगभरातील ३३ राष्ट्रांनी घेतली असेल तर, शिंदे गटाने 'जागतिक गद्दार दिन' साजरा करावा, किती निर्लज्जपणे गद्दारी केली होती, हे ही जनतेला त्यांनी दाखवून द्यावं, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे म्हणाले, "शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आम्हीच साजरा करत आहोत. ज्यांची हकालपट्टी झाली आहे, सगळीकडून ज्यांना नाकारलं गेलंय, असा माल आमचा वर्धापन दिन कसा साजरा करू शकतो. अशा गद्दारांनी जागतिक गद्दार दिन साजरा करावा, कारण यांच्या गद्दारीची नोंद जगातल्या ३३ राष्ट्रांनी घेतली आहे. गद्दारीचा दिवस त्यांनी साजरा करावा, किती निर्लज्जपणे गद्दारी केली होती, हे या गद्दारांनी दाखवून द्यावं.”

Aditya Thackeray Eknath Shinde
Shishir Shinde resign : मनासारखं काम मिळत नसल्याने शिशिर शिंदेंचा ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' ; वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला..

वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात आज ठाकरे गटाचं राज्यव्यापी शिबीर आहे. या शिबिराची जोरदार तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या शिबिराला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दाखल होत आहेत. याच कामाच्या पाहणीसाठी आदित्य वरळीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाध साधला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com