खडसे-पाटील हा तर जुना वाद, तो चर्चेतून सुटेल!

यावल येथे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद अद्याप धुमसत आहे.
Rohini Khadse (NCP) & Chandrakant Patil (Shivsena)

Rohini Khadse (NCP) & Chandrakant Patil (Shivsena)

Sarkarnama

Published on
Updated on

यावल : जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यावरील हल्ल्याचे प्रकरण अद्याप शांत झालेले नाही. माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात वीस वर्षांपासून वाद आहेत. एकत्र बसून हा प्रश्न सोडवू, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिक येथे सांगितले.

<div class="paragraphs"><p>Rohini Khadse (NCP) &amp; Chandrakant Patil (Shivsena)</p></div>
संजय राऊतांचा नाशिक दौरा फलदायी... सेनेत इनकमिंग सुरू...

याबाबत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, नेत्यांच्या समर्थनार्थ व विरोधकांवर कारवाईसाठी निवेदन, आरोप, प्रत्यारोपांचे सत्र थांबविण्यास तयार नाहीत. दोन्हींकडून त्याला प्रोत्साहन दिले जात असल्याचे बोलेल जाते.

दरम्यान जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ येथील तहसीलदारांना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या प्रसंगी माजी आमदार अरुण पाटील, तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मुरलीधर तायडे, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, तालुका सरचिटणीस वाय. डी. पाटील, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, योगिता वानखेडे, माया बारी, रावेर शहराध्यक्ष शेख मेहमूद आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>Rohini Khadse (NCP) &amp; Chandrakant Patil (Shivsena)</p></div>
धक्कादायक...इथे लस नव्हे फक्त प्रमाणपत्र मिळत होते!

शिवसेना कार्यक्रत्यांनी तहसीलदार व पोलिसांना निवेदन दिले. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी रोहिणी खडसे-खेवलकर यांचा निषेध केला. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तत्काळ कारवाई न केल्यास शिवसैनिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. लोकप्रतिनिधींच्या संदर्भात अशा प्रकारे वक्तव्य करणे निषेधार्थ असून, खडसे कुटुंबीय लोकप्रतिनिधींच्या जिवावर उठलेले दिसत आहे. तेव्हा अशा प्रकारे चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. तत्काळ कारवाई न केल्यास शिवसेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

शिवसेना जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, उपप्रमुख शरद कोळी, आदिवासी आघाडी प्रमुख हुसेन तडवी, पप्पू जोशी, संतोष खर्चे, कडू पाटील, सारंग बेहेडे, भरत चौधरी, अजहर खाटीकआदी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com