धक्कादायक...इथे लस नव्हे फक्त प्रमाणपत्र मिळत होते!

डोस न देता कोट्यवधींचा गैरउद्योग; धुळे महापालिका आरोपीच्या पिंजऱ्यात
Dhule Corporation Bulding

Dhule Corporation Bulding

Sarkarnama

Published on
Updated on

धुळे : कोविड (Covid) प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत धुळे (Dhule) महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर बोगस लसीकरण (Vaccination) प्रमाणपत्र वितरित केले गेले. यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात ‘मालेगाव कनेक्शन’ही समोर आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. त्याची चौकशी चौकशी सुरू आहे.

<div class="paragraphs"><p>Dhule Corporation Bulding</p></div>
भुसावळ पालिकेवर आजपासून भाजप आऊट, प्रशासक इन!

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासनाने शासकीय यंत्रणेला रात्रंदिवस कामाला लावले आहे. त्यात आता राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर नागरिकांच्या लसीकरणाचा तगादा लागला आहे. त्यातच धुळ्यात महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना बोगस लसीकरण प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली, असा आरोप झाला आहे. सुरवातीला महापालिकेच्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी भाजपचे सदस्य सुनील बैसाणे यांनी बोगस लसीकरण प्रमाणपत्र वितरित झाल्याचा आरोप केला. मात्र, त्या वेळी प्रशासनाने अशी कोणतीही तक्रार नसल्याचे म्हणत हा विषय टोलविला होता.

<div class="paragraphs"><p>Dhule Corporation Bulding</p></div>
संजय राऊतांचा नाशिक दौरा फलदायी... सेनेत इनकमिंग सुरू...

दरम्यान, आता शिवसेनेचे महानगरप्रमुख मनोज मोरे यांनी बोगस लसीकरण प्रमाणपत्रे वितरित झाली, त्यात वापरात न आलेल्या लशींच्या काळ्या बाजारात विक्रीच्या संशयामुळे दोन कोटींपर्यंत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला. शिवसेनेने या विषयावर दोनच दिवसांपूर्वी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करून चौकशी व संबंधितांवर कारवाईची मागणी केली. यानंतर आता या बोगस लसीकरण प्रमाणपत्रांच्या विषयात ‘मालेगाव कनेक्शन’ समोर आल्याने विषय गंभीर बनला आहे. याबाबत आता जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही महापालिका आयुक्तांना चौकशीचा आदेश दिला आहे.

महापालिकेच्या माध्यमातून चालणाऱ्या लसीकरण केंद्रांवरून ज्या लाभार्थ्यांना लस दिल्याचे दाखविले गेले, त्यातील अनेक जणांना लस न देताच केवळ ऑनलाइन प्रमाणपत्र वितरित झाल्याचा आरोप आहे. यात मालेगाव शहरातील नागरिकांनाही असे प्रमाणपत्र वितरित झाल्याचा आरोप आहे. ८४ दिवसांनंतर लशीचा बॅच नंबर बदलतो, मात्र संबंधित नागरिकांना दिलेल्या प्रमाणपत्रांवर दोन्ही डोसचे बॅच नंबर सारखेच आढळून आले आहेत. त्यामुळे बोगस लसीकरण प्रमाणपत्र वितरित झाल्याचा संशय बळावला आहे. याबाबत मालेगाव महापालिका प्रशासनाकडून धुळे महापालिका प्रशासनाशीही चौकशीबाबत पत्रव्यवहार झाला आहे.

केंद्र, राज्य शासन कोविड लसीकरणाच्या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष घालत असताना धुळे महापालिकेतील अधिकारी मात्र बोगस लसीकरण प्रमाणपत्रांच्या विषयातही सुस्तच असल्याचे दिसून येत आहे. आता प्रकरणाचा गाजावाजा झाल्यानंतर व जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर बैठकांचे सत्र सुरू आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com