Congress News : खान्देशात कॉंग्रेसला दुसरा मोठा धक्का, बड्या महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Pratibha Shinde resignation : आदिवासींचे आणि वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी दोनच वर्षांपूर्वी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या प्रतिभा शिंदे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पक्षासाठी हा मोठा धक्का आहे.
Rahul Gandhi - Harshwardhan Sapkal- Congress
Rahul Gandhi - Harshwardhan Sapkal- Congress Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : कुणाल पाटील यांनी सोडचिठ्ठी दिल्याने खान्देशात कॉंग्रेसला मोठा फटका बसला आहे. त्यातून सावरत नाही तोच कॉंग्रेसला आता परत दुसरा मोठा बसला आहे. जळगावातील कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी सोमवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाला सावरण्यासाठी काँग्रेसने अनेक प्रयत्न केले. प्रदेश कार्यकारिणीवर जिल्ह्यातील सात जणांची नुकतीच नियुक्ती केली. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर असतानाच कॉंग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. दोन वर्षांपूर्वीच प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना पक्षाने प्रदेश उपाध्यक्षपदी जबाबदारी दिली होती. आदिवासी नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र त्यांनी अचानक पक्षाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता कॉंग्रेसने दुसऱ्यांदा त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली होती. पुन्हा प्रदेश कार्यकारिणीवर संधी मिळून आठ दिवस उलटत नाही तोच प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला आहे. इतक्या तडकाफडकी त्यांनी राजीनामा का दिला यावरुन जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण शिंदे यांनीही राजीनाम्याचे नेमके कारण प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात नमूद केलेले नाही.

Rahul Gandhi - Harshwardhan Sapkal- Congress
Jalgaon politics : जळगावच्या रणांगणात नवा खेळाडू ; दोन्ही आघाड्यांना झुंज देण्यासाठी तिसरीच आघाडी मैदानात

मंगळवारी जळगावमध्ये शिंदे या पत्रकारपरिषद घेऊन आपल्या पुढील राजकीय वाटचालीविषयीची भूमिका जाहीर करणार आहेत. त्यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असतानाच शिंदे या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रतिभा शिंदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

Rahul Gandhi - Harshwardhan Sapkal- Congress
Girish Mahajan Politics : खडसेंविरोधात आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी हद्द ओलांडली ; गिरीश महाजन म्हणाले, हे योग्य नाही..

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने महायुतीमधील घटक पक्षांनी आपल्या पक्षात मोठे इनकमिंग सुरु ठेवले आहे. त्याचाच भाग म्हणून जळगावात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने यापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील अनेक दिग्गज नेते गळाला लावले आहेत. आता कॉंग्रेसच्या प्रतिभा शिंदे यांचाही अजित पवारांच्या पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com