Ashok Kharat : भोंदू खरात प्रकरणात अंनिस आक्रमक ; परिषद घेऊन सर्वच राजकीय पक्षांकडे केली मोठी मागणी

Ashok Kharat Case ANIS Demand : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने फल ज्योतिष व बुवाबाजी विरोधी संघर्ष राज्य परिषदेचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले होते. तसेच यावेळी निषेध रॅली देखील काढण्यात आली.
Ashok Kharat
Ashok Kharat Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : शेकडो महिलांचे लैगिंक शोषण व फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांची देशभर चर्चा आहे. भोंदूगिरीच्या नावाने शेकडो महिलांवर त्याने अत्याचार केले. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच अनेक हायप्रोफाईल लोकांची आर्थिक लूट त्याने केली. दरम्यान अनेक राजकीय नेत्यांचे भोंदू खरासोबतचे फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. अनेक राजकीय नेत्यांनी त्याची भेट घेतल्याचे समोर आले. त्यातून राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले तसेच आरोप झाले.

सर्वात धक्कादायक म्हणजे महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे या भोंदू खरातचे पाय धुतानाचे, त्याच्या डोक्यावर छत्री धरल्याचे फोटो व्हायरल झाले. त्यातून पुढे रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देखील त्यांना द्यावा लागला. हे प्रकरण चाकणकर यांना चांगलच भोवलं. आता एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे.

यानंतर आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपल्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी भोंदू बाबा-बुवांबाबत स्पष्ट आणि कडक आचारसंहिता जाहीर करावी, अशी ठाम मागणी नाशिक येथे पार पडलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फलज्योतिष व बुवाबाजीविरोधी संघर्ष परिषदेत करण्यात आली. सार्वजनिक जीवनात अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक गोष्टींना प्रोत्साहन मिळणार नाही, याची जबाबदारी सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे, असा सूर या परिषदेत उमटला.

Ashok Kharat
Ashok Kharat : एका तरुण मुलीचा मृत्यू अन् टाकला कुटिल डाव, खरातने उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरच्या जमिनीबाबत हादरवणारी माहिती समोर..

या परिषदेत पाच ठराव मंजूर करण्यात आले ज्यामध्ये, सर्व राजकीय पक्षांनी आपल्या नेते व पदाधिकाऱ्यांसाठी आचारसंहिता तयार करून अंधश्रद्धेला प्रोत्साहन रोखावे, असा ठराव देखील मंजूर करण्यात आला.

परिषदेत जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत प्रलंबित नियमावली तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली. कायद्याची व्याप्ती वाढवून अंकशास्त्र, हस्तसामुद्रिक, मुखसामुद्रिक अशा प्रकारांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा कायदा देशपातळीवर लागू करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमात वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट करणाऱ्या घटकांचा समावेश करण्यावर भर देण्यात आला. हे सर्व ठराव राज्य शासनापर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांतील अनेक पुढाऱ्यांची बाबा-बुवांशी असलेली सलगी ही उघड गुपितच असल्याची टीका परिषदेत करण्यात आली. अशोक खरात प्रकरणामुळे ही जवळीक अंधश्रद्धा आणि बुवाबाजीला खतपाणी घालणारी ठरत असल्याचे अधोरेखित झाले. त्यामुळे राजकीय नेत्यांनी अशा संबंधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पष्ट आचारसंहिता तयार करून ती जाहीर करणे अत्यावश्यक असल्याची ठाम भूमिका परिषदेतून मांडण्यात आली. (Nashik News)

Ashok Kharat
Ashok Kharat Marriage : अशोक खरातच्या लग्नाचा अजब किस्सा समोर... 'हळदीवेळी शर्टच काढत नव्हता', कारण ऐकुन बसेल धक्का

परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याध्यक्ष माधव बावगे, कार्याध्यक्ष संजय बनसोडे, प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य सरचिटणीस आरती नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष आशा लांडगे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील ३० जिल्ह्यांतून तीनशेहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवत या परिषदेला व्यापक प्रतिसाद दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com