Ashok Kharat Marriage : अशोक खरातच्या लग्नाचा अजब किस्सा समोर... 'हळदीवेळी शर्टच काढत नव्हता', कारण ऐकुन बसेल धक्का

Ashok Kharat Marriage Story : अशोक खरातची सासुरवाडी सिन्नर तालुक्यातील पाडळी गावची. या गावातील ग्रामस्थांनी खरातच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला आहे. ज्याची चर्चा रंगली आहे.
Kalpana Kharat Marriage Story
Kalpana Kharat Marriage StorySarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat News : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणाने नवे वळण घेतले असून, त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावर देखील आता फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कल्पना खरात गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. ती परदेशात पळून जाऊ नये म्हणून शिर्डी पोलिसांनी तिच्या विरोधात लूकआउट नोटीस काढली आहे. एसआयटी पथक कल्पना यांचा शोध घेत आहे. दरम्यान कल्पना खरात यांच्या माहेरच्या पाडळी ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना काही खळबळजनक खुलासे केले आहेत.

अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिचे माहेर व अशोक खरातची सासुरवाडी असलेल्या सिन्नर तालुक्यातील पाडळी गावातील एका ग्रामस्थाने माध्यमांशी बोलताना अशोक खरात व कल्पना खरात यांच्या लग्नावेळीचा एक किस्सा सांगितला. ज्याची गावात जोरदार चर्चा रंगली आहे.

ग्रामस्थाने सांगितले की, लग्नाची हळद लावण्यासाठी अशोक खरातला कपडे काढायला सांगितले, मात्र त्याने कपडे काढायला नकार दिला. अखेरीस, सगळ्यांनी आग्रह करुन कपडे काढायला सांगितल्यावर त्याने कपडे काढले. त्यावेळी त्याच्या शरीरावर अनेक वार होते. त्याचवेळी आमच्या लक्षात आलं होतं की हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असेल. मात्र शिंदे कुटुंब गरीब असल्याने आणि लेकीचं चांगलं होईल या अपेक्षेने आम्ही त्यावेळी काही बोललो नाही असा किस्सा एका ग्रामस्थाने माध्यमांशी बोलताना सांगितला.

Kalpana Kharat Marriage Story
Kalpana Kharat : 'अशोक खरातने बायकोला 16 वर्षांपासून माहेरीच पाठवलेलं नाही...'; फरार कल्पनाच्या माहेरच्यांचा SIT समोर धक्कादायक खुलासा

एका ग्रामस्थाने सांगितले की, अशोक खरात व कल्पना यांचे लग्न गावातील मारुती मंदिरात साध्या पद्धतीने झालं. त्यावेळी कल्पना खरात यांची परिस्थिती हालाखीची होती. परंतु तरीही अशोक खरातचं वय जास्त असल्याने कल्पना यांच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. मात्र नंतर हे लग्न कसं जमलं ते कोणालाच माहीत नाही. लग्नानंतर अशोक खरात फक्त काही विशेष कार्यक्रम असेल किंवा दुःखद प्रसंगीच पाडळीत यायचा. आम्ही त्याच्याकडे जायचो मात्र त्याचे गुण काही व्यवस्थित दिसले नाही असे एका ग्रामस्थाने सांगितले.

यावेळी ग्रामस्थांनी अशोक खरातच्या कारनाम्यांबद्दल चीड व्यक्त केली. एक ग्रामस्थ म्हणाला, आमच्या गावाला केंद्रीय कृषिमंत्री स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे यांचा वारसा असून त्यांच्यामुळे आमच्या गावाचं नाव देशात घेतलं जात होतं. मात्र या अशोक खरातने आमच्या गावचे नाव खराब केल्याची संतप्त प्रतिक्रिया एका ग्रामस्थाने दिली. (Nashik News)

Kalpana Kharat Marriage Story
Ashok Kharat : एका तरुण मुलीचा मृत्यू अन् टाकला कुटिल डाव, खरातने उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरच्या जमिनीबाबत हादरवणारी माहिती समोर..

दरम्यान कल्पना खरात यांच्या माहेरच्यांशी कल्पना या तब्बल 16 वर्षापासून संपर्कात नाही. अशोक खरात हा तिला कधीही भेटायला येऊ देत नव्हता अशी माहिती दिली. विवाह झाल्यावर कल्पनाने माहेरशी फारसा संपर्क ठेवला नव्हता. भावाला देखील कल्पना कधी भेटायला आली नाही, अशी माहिती तिच्या माहेरच्यांनी दिली. तसेच कल्पनाचे माहेरचे लोक तुटपुंज्या शेतीवर उदरनिर्वाह करत असल्याचे पाडळी ग्रामस्थांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com