Kishor Darade News : शिवसेनेच्या किशोर दराडेंना दुसऱ्या फेरीत मोठी आघाडी; समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण!

Kishor Darade and Nashik Teachers Constituency Election : विवेक कोल्हे आणि संदीप गुळवे यांच्यातील मत विभागणीचा दराडेंना लाभ झाल्याचे चित्र
Kishor Darade
Kishor DaradeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Teachers Constituency Election Result News: नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसऱ्या फेरीच्या मतांच्या अधिकृत आकडेवारीने आमदार किशोर दराडे समर्थकांना उत्साहित केले आहे.

या निवडणुकीच्या पहिल्या फेरीच्या मतमोजणीत शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटाचे उमेदवार आमदार दराडे पहिल्या स्थानावर होते. अपक्ष विवेक कोल्हे दुसऱ्या आणि ठाकरे गटाचे संदीप गुळवे तिसऱ्या क्रमांकावर होते. हे चित्र दुसऱ्या फेरीत पूर्णतः बदलल्याचे बोलले जाते.

दुसऱ्या फेरीअखेर आमदार दराडे(Kishor Darade) यांना 24 हजार 239, विवेक कोल्हे यांना 15 हजार 564 आणि ठाकरे गटाचे गुळवे यांना 15 हजार 133 मते मिळाली आहेत. त्यानुसार आमदार दराडे आठ हजार 408 मतांनी आघाडीवर आहेत.

Kishor Darade
Nashik Teachers Constituency: नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचे दराडे अन् विवेक कोल्हेंमध्ये 'टफ फाईट'

आमदार दराडे यांना पहिल्या फेरीत 11 हजार 125 मते मिळाली होती. दुसऱ्या फेरीत त्यात वाढ होऊन 13 हजार 248 मते मिळाली आहेत. त्या तुलनेत अपक्ष कोल्हे यांना पहिल्या फेरीत 9 हजार 370 मते होती. दुसऱ्या फेरीत त्यांची पीछेहाट होत अवघी सहा हजार 615 मते मिळाली आहेत. या उलट शिवसेना ठाकरे(Uddhav Thackeray) गटाचे गुळवे यांना पहिल्या फेरीत अवघी 7 हजार 88मते होती. दुसऱ्या फेरीत त्यांना तेवढीच 7 हजार 904 मते मिळाली आहेत.

Kishor Darade
Teachers Constituency 2024 : शिक्षक निवडणुकीत चुरस, दराडे किंचित आघाडीवर!

त्यामुळे विधान परिषदेच्या या निवडणुकीत शिवसेनेच्या(Shivsena) शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. विविध नेत्यांचा आणि शिक्षण संस्थांचा पाठिंबा असूनही कोल्हे तिसऱ्या क्रमांकावर गेले. कोल्हे आणि गुळवे यांच्या मत विभागणीचा लाभ उचलण्यात आमदार दराडे यशस्वी झाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com