MLA Aashutosh Kale In NCP Ajit Pawar Group : अमेरिकेचा दौरा आटोपून मुंबईत पाऊल ठेवताच आमदार आशुतोष काळेंचं अजितदादांना समर्थन

Maharashtra Politics : राष्ट्रवादीतील या उभ्या फुटीदरम्यान झालेल्या सर्व घडामोडींदरम्यान कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे अमेरिकेत होते.
MLA Aashutosh Kale,Ajit Pawar
MLA Aashutosh Kale,Ajit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : कोपरगावचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे हे अजित पवार गटासोबत असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. काळे यांनी बुधवारी (दि.12) अमेरिकेतून परतताच मुंबईत सकाळी देवगिरी बंगल्यावर जात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

आमदार आशुतोष काळे यांनी बुधवारी (दि.12) विदेशातून परतताच मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेत आपला पाठिंबा जाहीर केला. याबाबत काळे यांनी अजितदादा पवार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेत पाठिंबा दिला असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच, शरद पवार आमचे दैवत आहेत. त्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहेत असा विश्वास व्यक्त करत मी घेतलेल्या या निर्णयाला सर्व कार्यकर्त्यांचा व कोपरगाव (Kopargaon) मतदारसंघातील मतदारांचा पूर्ण पाठिंबा राहील याची मला खात्री आहे असाही विश्वास व्यक्त केला आहे.

MLA Aashutosh Kale,Ajit Pawar
Phaltan News : आत्महत्या करेन पण, इतर कुठल्याही पक्षातून आमदार, खासदार होणार नाही... जानकर

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यात पवार यांनी उपमुख्यमंत्री तर छगन भुजबळ,दिलीप वळसे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे आदी महत्वाच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

यावेळी अजित पवार, पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चाळीसपेक्षा अधिक आमदारांचा तसेच दोन अपक्ष आमदारांचा अजित पवार गटाला स्वाक्षरीसह पाठिंबा असल्याचा दावा केला. प्रत्यक्षात अजित पवार आणि शरद पवार गटात नेमके किती-किती आमदार आहे. याबद्दल अजूनही स्पष्टता नसली तरी आता ही अस्पष्टता दूर होऊ लागली आहे.

MLA Aashutosh Kale,Ajit Pawar
Abdul Sattar News : निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती, सत्तारांच्या विरोधात खटला चालवण्याचे आदेश..

अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहा आमदार आहेत. त्यापैकी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सुरुवातीपासूनच शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. रोहित पवार हे शरद पवारांचे नातू आहेत तर प्राजक्त तनपुरे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत. पारनेरचे आमदार निलेश लंके आणि नगरचे आमदार संग्राम जगताप अजित पवार यांच्या गटासोबत गेले आहेत.

अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांचे मात्र काही दिवस तळ्यात की मळ्यात दिसून आले. अजित पवारांच्या शपथविधीला ते उपस्थित होते. नंतर दोनच दिवसांत त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरवर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात त्यांनी शरद पवार गटात असल्याचे सांगितले. त्यानंतर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी लहामटे यांचा अकोले तालुक्यात तीन दिवस पिच्छा पुरवत त्यांना अखेर अजित पवार गटाकडे वळवले.

MLA Aashutosh Kale,Ajit Pawar
Rahul Gandhi New House : ...अखेर राहुल गांधींना दिल्लीत घर मिळालं ! आता 'या' ठिकाणी असणार नवा मुक्काम

राष्ट्रवादीतील या उभ्या फुटीदरम्यान झालेल्या सर्व घडामोडींदरम्यान कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे अमेरिकेत होते. त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय राहणार याबद्दल विविध तर्क-वितर्क व्यक्त करण्यात येत होते. त्यांचे चंद्रशेखर घुले, जयंत पाटलांशी नातेसंबंध असल्याने आणि घुले परिवार शरद पवार यांच्या जवळचा मानला जात असल्याने आशुतोष काळे हे शरद पवार यांच्या गटात राहतील अशी शक्यता वर्तवली जात होती.

आमदार आशुतोष काळे(Aashutosh Kale) यांनी भूमिका स्पष्ट केल्याने नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहापैकी चार आमदार अजित पवार गटात तर दोन आमदार शरद पवार गटात असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले हे आमदार आशुतोष काळे यांचे सासरे आहेत. तसेच चंद्रशेखर घुलेंचे मोठे बंधू माजी आमदार नरेंद्र घुले हे जयंत पाटलांचे मेव्हुणे आहेत.

MLA Aashutosh Kale,Ajit Pawar
Maharashtra Cabinet Expansion: 100 नाही 101 टक्का मी मंत्री होणार; आमदार भरत गोगावलेंनी थोपटले दंड

अशात काळे अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे गेल्याने हा शरद पवार, जयंत पाटील यांना धक्का मानला जात आहे. दरम्यान, आमदार चंद्रशेखर घुले यांनीही नुकतीच अजित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा असली तरी त्याची पृष्ठी घुलेंकडून करण्यात आलेली नाही.

(Edited By Deepak KulkarnI)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.