Kumbh Mela scam: सिंहस्थ रिंग रोड घोटाळा उघड! आधी जमीन खरेदी, 10 दिवसांत रस्ताच वळवला; शेतकऱ्यांच्या आरोपांना मिळाला पुरावा?

Kumbh Mela Ring Road land purchase controversy :सिंहस्थ रिंग रोड प्रकल्पात मोठा वाद निर्माण झाला आहे. रस्त्याचा मार्ग बदलण्यापूर्वी जमीन खरेदी झाल्याचा आरोप असून शेतकऱ्यांनी त्यासंदर्भातील पुरावे समोर आणले आहेत.
Kumbh Mela Nashik
Kumbh Mela Nashik Sarkarnama
Published on
Updated on

Ring Road Corruption News: सिंहस्थ कुंभमेळा रिंग रोडच्या संपादनातील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. अधिकारी आणि आरेखक कंपनीने स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना बळी देण्याचा प्रकार पुढे आला आहे. या धक्कादायक प्रकाराने शेतकऱ्यांच्या आरोपात तथ्य आढळले. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 66 किलोमीटर रिंग रोड केला जात आहे. त्यासाठी 26 गावांमध्ये जमिनी संपादित केल्या जाणार आहे. या संपादनात सत्ताधारी नेते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी बदल केल्याचा गंभीर आरोप होत होता.

या भूसंपादनासाठी अधिकाऱ्यांनी नियम बाजूला ठेवून जमीन संपादनाची सक्ती केली होती. त्यात भल्या पहाटे घरात घुसून मातोरी येथे महिलांना मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले होते. आता या प्रकरणात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या रस्त्यासाठी स्वप्निल चिंतावार आणि सचिन चिंतावर यांच्या एकम कंपनीला आरेखनाचे काम दिले होते. कंपनीने स्वतःच्या जमिनींसाठी रस्ताच बदलण्याचे उघडकीस आले आहे.

Kumbh Mela Nashik
Toxic Liquor Tragedy in Pune: मध्यरात्री एका झटक्यात तब्बल 21 अधिकारी निलंबित; CM फडणवीसांच्या आदेशानंतर मोठी कारवाई

एकदम कंपनीने रिंग रोड संपादनाच्या यादीत समाविष्ट नसलेले क्षेत्र खरेदी केले. शहरातील गवळणी येथे सर्वे क्रमांक ११/५आणि ११/६ या जमिनी खरेदी केल्या. त्यानंतर पुढच्या दहा दिवसात चक्क रस्ता बदलून या जमिनी रोड फ्रंट करण्यात आल्या. संबंधित चिंतावार बंधूंनी हे अलाइनमेंट करताना रस्ता बदलला. स्वतःची जमीन रोड फ्रंट झाली. यासाठी मूळ रस्ताच बदलल्याने शेतकऱ्यांचा बळी देण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनी 14 मे 2026 रोजी रिंग रोड भूसंपादनाची यादी प्रकाशित केली. दे त्यामध्ये जमीन नव्हती. पुढच्या दहा दिवसात जमीन खरेदी करून ती रोड फ्रंट येईल अशी व्यवस्था करण्यात आली. हा एक प्रकार असून राजकीय नेते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या असंख्य जमिनींसाठी असेच घोटाळे झाल्याचा आरोप, आंदोलकांनी केला आहे.

हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने प्रशासन अडचणीत आले आहे. संदर्भात महापालिकेचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कानावर हात ठेवण्यात आले आहेत. थेट रस्ताच बदलून मोठा भ्रष्टाचार झाल्यानंतर याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. चौकशी केल्यानंतर पुढील माहिती कळवू असे सांगण्यात आले.

Kumbh Mela Nashik
MLC Election : नाशिक शिवसेना तर संभाजीनगर, जळगाव दोन्हीकडे भाजप लढण्याची शक्यता.. पाहा संभाव्य यादी

गेले काही दिवस रस्त्याच्या डीपी प्लॅन मध्ये बदल करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्याची तक्रार होती. यासाठी शेतकऱ्यांवर सक्ती करण्यात आल्याचा आरोप होता. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. आता यातील घोटाळे पुढे येऊ लागल्याने शासन काय भूमिका घेते याची उत्सुकता लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com