

MLC Election : विधान परिषदेतील १७ जागांसाठी १८ जूनला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने आता महायुतीच्या जागावाटपाचे चित्र स्पष्ट होण्याची घटिका जवळ आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज शनिवार (दि. ३०) दुपारपर्यंत महायुतीचे जागा वाटप स्पष्ट होण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये १७ पैकी जवळपास १४ जागांचे वाटप सूत्र यापूर्वीच ठरले आहे. मात्र, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व पुणे या तीन जागांवरुन चर्चा सुरु होती. या तीन जागांवरच गाडी अडकल्याने अद्याप जागावाटपाची अधिकृत घोषणा होऊ शकलेली नाही, ती आता होईल.
दोन दिवसांपूर्वी महायुतीची दिल्लीत बैठक झाली. महायुतीचे तीन्ही प्रमुख नेते भाजपचे देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार, शिवसेनेचे एकनाथ शिंदे गुरुवारी दिल्लीत तळ ठोकून होते. त्यानंतर जागा वाटपाचे सूत्र फायनल झाल्याचे समजते. त्यानुसार भाजप १२, शिंदेसेना ३, राष्ट्रवादी अजित पवार गट २ जागा लढवेल.
भाजप व शिवसेनेत छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकचा तिढा होता. अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपर्यंत हा विषय पोहचला. त्यांनी भाजपच्या वतीने फडणवीसांना यासंदर्भात काय तो निर्णय घेण्याचे अधिकार दिले. त्यानुसार अखेर हा तिढा सुटल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार, संभाजीनगरची जागा पहिल्यांदाच भाजप तर नाशिकची जागा शिवसेना लढवण्याची शक्यता आहे. तर, जळगावची जागा परंपरागत भाजपचीच असल्याने त्या जागेवर भाजपच लढणार असल्याचे कळते आहे.
संभाव्य महायुतीचे जागा वाटप
भाजप : जळगाव, छत्रपती संभाजीनगर-जालना, सोलापूर, अहिल्यानगर, सांगली-सातारा, नांदेड, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, परभणी-हिंगोली, धाराशिव-लातूर-बीड आणि नागपूर.
शिवसेना (शिंदे गट) : ठाणे, नाशिक आणि यवतमाळ.
राष्ट्रवादी अजित पवार गट : पुणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग.
मविआचेही ठरले
याचप्रमाणे मविआने १५ जागांचे वाटप ठरवले आहे. काँग्रेस ८, शिवसेना(उबाटा) ४, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ३ जागा लढवणार आहे. मविआत नाशिक, नांदेडसाठी रस्सीखेच सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.