Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठी अपडेट! 'या' महिलांना फटका बसणार; मंत्री अदिती तटकरेंची माहिती

Minister Aditi Tatkare Statement: महायुतीच्या यशात मोठा असलेल्या लाडकी बहीण योजनेविषयी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी (ता.2) महत्त्वाची माहिती दिली आहे.
 Aditi Tatkare
Aditi TatkareSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं मोलाचा वाटा उचलला होता. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा (CM Ladki Bahin Yojana) हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं.

पण डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयेच जमा करण्यात आला आहे.त्यामुळे 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे डोळे लागलेले असतानाच या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

राज्यातील ज्या कुटुंबांतील महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं सुरू केली होती. या योजनेतून आता काही महिलांना वगळलं जाण्याची शक्यता आहे.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी गुरुवारी (ता.2) लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. तटकरे म्हणाल्या,आमच्या महिला व बालकल्याण विभागाकडे लाडकी बहीण योजनेबाबत 5 प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आम्ही या तक्रारीची वेगवेगळ्या पध्दतीने पडताळणी करत आहोत असल्याचे त्यांनी सांगितले.

 Aditi Tatkare
Bjp News : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत भाजपच्या बड्या नेत्याने दिले 'हे' मोठे संकेत

तसेच लाडकी बहीण योजनेसाठी काही लाभार्थी महिलांनी स्वत:हून पत्र लिहित आपण पात्र नसल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे काही तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून आमच्याकडे केल्या आहेत. त्यामुळे तक्रारी प्राप्त झालेल्या संबंधित अर्जांची महिला व बालकल्याण खात्याकडून पडताळणी केली जाणार आहे. मात्र,या योजनेच्या अध्यादेशात कुठलाही बदल केला जाणार नसल्याचे स्पष्टीकरण मंत्री तटकरे यांनी दिले आहेत.

महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरेंनी म्हणाल्या, ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे,तरी योजनेचा फायदा घेत असलेल्या,चार चाकी वाहनं,एकच महिलेचे दोन अर्ज,लग्नानंतर इतर राज्यात स्थलांतरित,आधार कार्ड आणि कागद पत्रावरील नावांमध्ये तफावत, अशाप्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

 Aditi Tatkare
Sharad Pawar NCP: प्रचंड बहुमत असतानाही शरद पवारांचा 'हा' आमदार म्हणतो, 'महायुती सरकार तीन महिन्यांत कोसळणारच..!

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घवघवीत यशात मोलाचा वाटा असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारकडून हिवाळी अधिवेशनात 1400 कोटींची तरतूद करण्यात आली होती. शिवाय हिवाळी अधिवेशानात पुरवणी मागण्यांत तरतूद केलेल्या रक्कमेमुळे लाडक्या बहि‍णींना डिसेंबर महिन्याचे पैसेही मिळाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com